IPL 2019: सनरायझर्स हैद्राबाद संघाने या ३ दिग्गज खेळाडूंना दिला संघातून डच्चू

हैद्राबाद | आयपीएल २०१९साठी कोणत्या खेळाडूंना संघात ठेवायचे आणि कोणत्या खेळाडूंना मुक्त करायचे ही यादी देण्याचा आजचा शेवटचा दिवस होता.

सनरायझर्स हैद्राबाद संघाने यापुर्वीच शिखर धवनला संघातून मुक्त केले आहे. त्याबदल्यात संघाने अभिषेक शर्मा, शाबाद नदीम आणि विजय शंकर या तीन खेळाडूंना संघात घेतले.

या संघाने ८ खेळाडूंना करारातून मुक्त केले असून १७ खेळाडूंना कायम ठेवले आहे. हैद्राबादने २०१८ हंगामात ज्या खेळाडूंकडून चांगली कामगिरी झाली नाही किंवा ज्यांचा संघाला खूपच कमी उपयोग झाला अशा खेळाडूंना संघातून डच्चू दिला आहे.

यात वृद्दीमान सहा, कार्लोस ब्रेथवेट, ख्रीस जाॅर्डन, अॅलेक्स हेल्स, सचिन बेबी, बिपुल शर्मा, सईद मेहदी हसन आणि तन्मय अगरवाल या खेळाडूंचा समावेश आहे.

तर कायम केलेल्या खेळाडूंमध्ये बेसिल थंपी, भुवनेश्वर कुमार, दिपक हुडा, मनिष पांडे, नटराजन, रिकी भूई, संदिप शर्मा, एस गोस्वामी, सिद्धार्थ कौल, सईद खलील अहमद, युसुफ पठाण, बिली स्टाॅनलेक, डेविड वार्नर, केन विलियमसन, मोहम्मद नाबी, राशिद खान आणि शाकिब अल हसनचा समावेश आहे.

तर दिल्ली डेअरडेविल्सकडून  शिखऱ धवनच्या बदल्यात अभिषेक शर्मा, शाबाद नदीम आणि विजय शंकर या तीन खेळाडूंना संघात घेतले.

वाचा महत्त्वाच्या बातम्या- 

युवराज सिंग फॅन्ससाठी ही आहे यावर्षातील सर्वात मोठी बातमी

का सचिनचा आंतरराष्ट्रीय पदार्पणाचा सामना भारतीयांना पाहता आला नव्हता?

रुट- कोहलीबरोबर घडला क्रिकेटमधील सर्वात वेगळा योगायोग

१६१ कसोटीत कूकला जे जमले नाही ते सॅम करनने ७ कसोटीत करुन दाखवले

टीम इंडियाला नडलेल्या सॅम करनचा श्रीलंकेला तडाखा