आयपीएल चाहत्यांना मोठा धक्का, २०१९च्या आयपीएलमध्ये दिसणार नाही ही ऑस्ट्रेलियाची स्फोटक जोडी

आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) 2019च्या लिलावापूर्वीच क्रिकेट चाहत्यांना धक्का देणारी माहिती समोर आली आहे. यावर्षीच्या हंगामात ऑस्ट्रेलियाचे स्टार खेळाडू एरॉन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांनीही या 12व्या हंगामात खेळणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये फिंच हा किंग्ज इलेवन पंजाबकडून तर मॅक्सवेल दिल्ली डेयरडेविल्स (दिल्ली कॅपिटल्स) कडून खेळत होते.

ऑस्ट्रेलियाच्या या जोडीने टी20 क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली असून यावर्षी होणाऱ्या लिलावात त्यांनी आपले नाव दिले नाही. मात्र मागील आयपीएलच्या हंगामात त्यांची कामगिरी निराशाजनक झाली होती. यामुळे त्यांच्या संघाने यावर्षी त्यांना मुक्त केले आहे.

2018च्या आयपीएलमध्ये मॅक्सवेलने 12 सामने खेळताना 14.08च्या सरासरीने 169 धावा केल्या होत्या. फिंचनेही 10 सामन्यात खेळताना 134 धावा केल्या होत्या.

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, मिशेल स्टार्क आणि पॅट कमिन्स हे दोघे पण यावर्षीच्या आयपीएलमध्ये खेळणार नसल्याची शक्यता आहे. या दोघांनाही मागील हंगामात झालेल्या लिलावात मोठ्या किंमतीत खरेदी केले होते. मात्र दुखापतीमुळे ते खेळू शकले नाही.

2019च्या आयपीएलचा लिलाव 18 डिसेंबरला जयपूर येथे होणार असून यामध्ये 1003खेळाडू सहभागी होणार असून यात 232 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तसेच आयपीएलमध्ये पहिल्यांदाच अरूणाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, मेघायल, मिझोरम, नागालॅंड, मणिपूर, सिक्कीम, पुदुच्चेरी येथील खेळाडूही या लिलावाच्या प्रक्रियेत असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आयपीएल २०१९च्या लिलावासाठी युवराजची मागील वर्षीपेक्षा तब्बल एक कोटीने कमी झाली मूळ किंमत

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: चेतेश्वर पुजाराच्या शतकाने राखली भारताची लाज

तीन धावांवर बाद होऊनही कर्णधार कोहलीने केला हा खास पराक्रम