२०१९ मध्ये आयपीएल जाणार भारताबाहेर?

2019 ला होणाऱ्या आयपीएलच्या 12 वा मोसमाचे आयोजन भारताबाहेर होण्याची शक्यता आहे. जर आयपीएलमधील सामने आणि 2019 ला होणाऱ्या सर्वसाधारण निवडणूका यांच्या तारखा एकाच वेळी आल्या तर आयपीएल 2019 मधील काही सामने भारताबाहेर हलवले जाऊ शकतात.

याआधीही अशा कारणामुळे 2009 ला संपूर्ण आयपीएलची स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत झाली होती, तर 2014 ला आयपीएलच्या पहिल्या सत्रातील सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये झाले होते. यावेळीही निवडणूकांमुळेच हे सामने हलवण्यात आले होते.

याबद्दल हिंदूस्तान टाइम्सशी बोलताना आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले, बीसीसीआय सर्वसाधारण निवडणुकांच्या तारखा जाहिर होण्याची वाट पाहत आहे. त्यानंतर याविषयी निर्णय घेतला जाईल.

ते म्हणाले, “जर सर्वसाधारण निवडणुकांच्या तारखा आणि आयपीएलच्या तारखा एकाचवेळी आल्या तर आयपीएलची स्पर्धा भारताबाहेर हलवली जाईल. पण सध्या तरी आम्ही वेळापत्रकाबाबत निर्णय घेण्यासाठी तारखा जाहिर होण्याची वाट पाहत आहोत.”

भारताबाहेर आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याच्या ठिकाणांच्या पर्यायाविषयी शुक्ला म्हणाले, “संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयपीएलचे सामने खेळवण्याचा अनुभव खूप चांगला होता. त्यामुळे तो पर्याय नक्कीच असेल. पण दुसरा पर्याय हा दक्षिण आफ्रिका असेल. पण हा निर्णय सर्वसाधारण निवडणुकांच्या तारखा लक्षात घेऊन घेतला जाईल.”

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

असा पराक्रम करणारा केएल राहुल बनला अजिंक्य रहाणे नंतरचा दुसराच भारतीय क्रिकेटपटू

श्रीलंका दौरा: स्म्रीती मानधनाने अर्धशतक करत भारतीय महिला संघाला मिळवून दिला पहिला विजय

स्वित्झर्लंड विरुद्धच्या मैत्रीपूर्व सामन्यास इंग्लंड स्ट्रायकर हॅरी केनला विश्रांती