आयपीएल २०१९चा थरार रंगणार या देशात!

आयपीएलचा (इंडियन प्रीमियर लीग) यावर्षी 12वा हंगाम असून तो भारतातच होणार आहे असे बीसीसीआयने जाहिर केले आहे. या हंगामाला 23 मार्चपासून सुरूवात होणार आहे.

भारतात यावर्षी सर्वसाधारण निवडणुका होणार असल्याने आयपीएल भारताबाहेर होण्याची चर्चा होत होती. कारण निवडणुका आणि आयपीएल सामन्यांच्या तारखा एकत्र येण्याची शक्यता होती. मात्र बीसीसीआयने या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली समिती(सीओए)ने दिल्लीमध्ये अधिकाऱ्यांची भेट घेतली. यामध्ये त्यांनी आयपीएलची तारीख आणि ठिकाण निश्चित केले आहे. तर निवडणुका एप्रिल आणि मेमध्ये होणार आहे.

आयपीएलचे संपुर्ण वेळापत्रक सीओए संघाच्या मालकांशी चर्चा करून जाहिर करणार आहे. 18 डिसेंबरला 2019 च्या आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव झाला होता.

याआधी दोन वेळा आयपीएलची स्पर्धा निवडणुंकामुळे भारताबाहेर झाली होती. 2009ला दक्षिण आफ्रिका तर 2014ला काही सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये झाले होते. मे-जुलैमध्ये इंग्लंडमध्ये आयसीसी विश्वचषक स्पर्धा होणार असल्याने यावर्षी आयपीएल लवकर होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

रिषभ पंतचा नादच खुळा! आज पुन्हा धोनीचा कसोटी क्रमवारीचा विक्रम मोडला

कसोटी मालिकेतील शानदार प्रदर्शनानंतरही बुमराह खेळणार नाही वनडे मालिका

गुरुजी शास्त्रींचं पुन्हा धाडसी विधान, ऐकून व्हाल अवाक्