आयपीएल लिलाव: आजच्या दिवसाच्या निकालाप्रमाणे हे खेळाडू खेळणार या संघांकडून

बंगलोर। आयपीएल २०१८ च्या लिलावाचा आज पहिला दिवस होता. आज या लिलावात अनेक मोठे निर्णय बघायला मिळाले. त्याचबरोबर फ्रॅन्चायझींमध्येही चांगलीच चुरस रंगली. 

आजच्या लिलावाप्रमाणे इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला राजस्थान रॉयल्सने १२.५० कोटी देऊन संघात घेतले. त्याच्या पाठोपाठ मनीष पांडे आणि केएल राहुल यांना ११ कोटीची बोली लागली. मनीषला सनरायझर्स हैद्राबादने तर राहुलला किंग्स इलेव्हन पंजाबने संघात घेतले.

आज चेन्नईचा महत्वाचा गोलंदाज आर अश्विनला मात्र चेन्नई सुपर किंग्स संघात कायम ठेवण्यात त्यांना अपयश आले. अश्विनलाही किंग्स इलेव्हन पंजाबने संघात घेतले. तर कोलकाता संघाचा कर्णधार गौतम गंभीर तब्बल ७ वर्षांनंतर पुन्हा दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळेल.

याबरोबरच आज अनेक धक्कादायक निकालही पाहायला मिळाले. ख्रिस गेल, जो रूट, मिचेल जॉन्सन, टीम साऊथी, हाशिम अमला, इशांत शर्मा, मुरली विजय, पार्थिव पटेल असे अनुभवी खेळाडू अनसोल्ड राहिले.

काही फ्रॅन्चायझींनी आज राईट टू मॅच कार्डचा देखील वापर केला आहे.

आजच्या दिवसाच्या निकालाप्रमाणे हे खेळाडू खेळणार या संघांकडून:

चेन्नई सुपर किंग्स :
एम एस धोनी (१५ कोटी)
सुरेश रैना (११ कोटी)
रवींद्र जडेजा (७ कोटी)
हरभजन सिंग (२ कोटी)
फाफ डू प्लेसिस (१.६ कोटी)(आरटीएम)
ड्वेन ब्रावो (६.५ कोटी)(आरटीएम)
केदार जाधव (७.८ कोटी)
शेन वॉटसन (४ कोटी)
आंबती रायडू (२.२० कोटी)
इम्रान ताहीर(१ कोटी)
कर्ण शर्मा (५ कोटी)

मुंबई इंडियन्स :
रोहित शर्मा (१५ कोटी)
हार्दिक पंड्या (११ कोटी)
जसप्रीत बुमराह(७ कोटी)
किरॉन पोलार्ड (५.४ कोटी)(आरटीएम)
मुस्तफिजूर रेहमान (२.२० कोटी)
पॅट कमिन्स (५.४० कोटी)
सूर्यकुमार यादव (३.२० कोटी)
कृणाल पंड्या(८.८० कोटी)(आरटीएम)
ईशान किशन (६.२ कोटी)

सनरायझर्स हैद्राबाद :
डेव्हिड वॉर्नर (१२ कोटी)
भुवनेश्वर कुमार (८.५ कोटी)
युसुफ पठाण (१.९ कोटी)
कार्लोस ब्रेथवेट(२ कोटी)
मनीष पांडे(११ कोटी)
केन विलियम्सन (३ कोटी)
शाकिब अल हसन(२ कोटी)
शिखर धवन(५.२ कोटी)
वृद्धिमान सहा (५ कोटी)
रशीद खान (९ कोटी)(आरटीएम)
रिक्की भुई (२० लाख)
दीपक हुडा (३.६० कोटी)(आरटीएम)
सिद्धार्थ कौल (३.८० कोटी)
बॅसिल थंपी(९५ लाख)
सईद अल अहमद (३ कोटी)
टी नटराजन (४० लाख )

राजस्थान रॉयल्स :
स्टीव्ह स्मिथ (१२ कोटी)
अजिंक्य राहणे (४कोटी)
बेन स्टोक्स (१२.५० कोटी)
स्टुअर्ट बिन्नी (५० लाख)
संजू सॅमसन (८ कोटी)
जॉस बटलर (४.४० कोटी)
राहुल त्रिपाठी (३.४० कोटी)
डार्सी शॉर्ट (४ कोटी)
जोफ्रा आर्चर (७.२० कोटी)

किंग्स इलेव्हन पंजाब:
अक्षर पटेल (६.५ कोटी)
युवराज सिंग (२कोटी)
आर अश्विन (७.६ कोटी)
करूण नायर (५.६ कोटी)
के एल राहुल (११ कोटी)
ऍरॉन फिंच (६.२ कोटी)
डेव्हिड मिलर (६ कोटी)
मार्कस स्टोयनीस (६कोटी)
मयांक अग्रवाल (१ कोटी)
अंकित राजपूत (३ कोटी)

कोलकाता नाईट रायडर्स :
सुनील नारायण (८.५ कोटी)
आंद्रे रसेल (७ कोटी)
ख्रिस लिन (९.६ कोटी)
मिशेल स्टार्क (९.४ कोटी)
दिनेश कार्तिक (७.४ कोटी)
रॉबिन उथप्पा (६.४० कोटी)(आरटीएम)
पियुष चावला (४.२० कोटी)(आरटीएम)
कुलदीप यादव (५.८० कोटी )(आरटीएम)
शुभम गिल (१.८० कोटी)
ईशान जग्गी (२० लाख)
कमलेश नागरकोटी (३.२० कोटी)
नितीश राणा (३.४० कोटी)

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर: 
विराट कोहली (१७ कोटी)
एबी डिव्हिलियर्स (११ कोटी)
सर्फराज खान (१.७५ कोटी)
मोईन अली(१.७ कोटी)
कॉलिन डी ग्रँडहोम(२.२ कोटी)
ख्रिस वोक्स(७.४ कोटी)
ब्रेंडन मॅक्युलम (३.६ कोटी)
क्विंटॉन डी कॉक (२.८० कोटी )
उमेश यादव (४.२० कोटी )
युजवेंद्र चहल (६ कोटी )(आरटीएम )
मनन वोहरा (१.१० कोटी)
कुलवंत खजुरिलिया (८५लाख )
अनिकेत चौधरी (३० लाख )
नवदीप सैनी (३ कोटी)

दिल्ली डेअरडेव्हिल्स :
रिषभ पंत (८ कोटी)
ख्रिस मॉरिस (७.१ कोटी)
श्रेयश अय्यर (७ कोटी)
ग्लेन मॅक्सवेल (९कोटी)
गौतम गंभीर (२.८ कोटी )
जेसन रॉय (६.५ कोटी)
कॉलिन मुनरो (१.९ कोटी)
मोहम्मद शमी (३ कोटी) (आरटीएम)
कागिसो रबाडा (४.२० कोटी)(आरटीएम)
अमित मिश्रा (४ कोटी)
पृथ्वी शॉ (१.२० कोटी)
राहुल तेवतीया (३कोटी )
विजय शंकर (३.२० कोटी)
हर्षल पटेल (२० लाख)
आवेश खान (७० लाख)