इंडियन प्रीमियर लिग – मनोरंजनाचा धमाका ५ एप्रिल पासून सुरु…!!

आयपीएलच्या १०व्या पर्वाला ५ एप्रिल पासून सुरुवात होत असून,  या खिताबाचे प्रबळ दावेदार बंगलोर, हैद्राबाद, कोलकाता आणि गुजरात मानले जात आहेत. मागील वर्षी घरच्या मैदानावर अंतिम सामना खेळत असूनही विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्सला हा ‘खिताब आपल्या नावावर करता आला नाही. मागील पर्वाचा विजेता संघ सनरायझर्स हैदराबादने या वर्षी लिलावात चांगले खेळाडू घेऊन आपली दावेदारी प्रबळ केली आहे. ५ एप्रिलला पहिला सामना हा या दोन संघामधेच होणार आहे. बंगलोर मागील वर्षाच्या पराभवाचा वचपा काढणार का,  हे बघण्यासारखे असेल.

 

यंदाच्या वर्षीच्या खेळाडूच्या लिलाव मध्ये, पुण्याने सर्वाधिक पैसे म्हणजेच १४. ५ कोटी खर्च करून इंग्लंडचा ऑलराऊंडर बेन स्टोक्सला आपल्या टीम मध्ये घेतले,  तसेच इंग्लंडचाच गोलंदाज तयमल  मिल्सला बंगलोरने १२ कोटी मध्ये घेतले. पुण्याच्या टीमने आणखीन एक धका दिला आहे तो म्हणजे कॅप्टन कूल धोनी या संघच नेतृत्व करणार नाही, या संघाचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथ करणार आहे. हैदराबादच्या संघाने कमीत कमी पैशात अफगाणिस्तानचे चांगले खेळाडू खिशात घातले आहेत. मुंबईनेही त्यांच्या आधीच्या खेळाडू जॉनसॅनला परत संघात घेतले आहे. त्यामुळे मुंबईची गोलंदाजी सुधारली आहे असे आता तरी वाटते आहे. गुजरातनेही आपल्या फलंदाजीची मधली फळी मजबुत करण्यासाठी इंग्लंडचाच फंलदाज जेसन रॉयला या पर्वासाठी संघात घेतले आहे.

 

महाराष्ट्रातील २ संघ म्हणजे मुबंई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपर जायन्ट हे दोन्ही आपल्या मागील वर्षपेक्षा चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक असतील. पुण्याच्या मागील वर्षाच्या टीम पेक्षा ही टीम अधिक सक्षम वाटत आहे. नवीन कर्णधार आणि नवीन खेळाडूंचं संघात आगमन यामुळे या वर्षी तरी पुणे आयपीएल जिंकू शकेल का ? हे आपल्याला लवकरच कळेल. पुण्याचा पहिला सामना हा मुंबईबरोबरच असून तो सहा एप्रिलला पुण्यातच खेळला जाणार आहे.