का होतोय हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल?

मुंबई | आज वानखेडेवर आयपीएल २०१८चा अंतिम सामना होत आहे. यामध्ये सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज संघ विजेतेपदासाठी लढणार आहे.

आयपीएलला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा सर्व कर्णधार असलेला आणि त्यात आयपीएल २०१८ची ट्राॅफी असलेला एक फोटो प्रसिद्ध करण्यात आला होता.

त्यात आयपीएल २०१८च्या फायनलमध्ये आज खेळत असलेले चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी आणि सनरायझर्स हैद्राबादचा कर्णधार केन विलियमसन दोन्ही बाजूला शेवटी उभे होते.

ट्राॅफीच्या दोन्ही बाजूला ४-४ कर्णधार उभे करण्यात आले होते. त्यात मुंबईकर अजिंक्य रहाणे आणि रोहीत शर्मा हे ट्राॅफीजवळच उभे होते. यातील केवळ गौतम गंभीरने ७ सामन्यानंतर कर्णधारपद सोडले होते.

आज हेच चित्र पुर्णपणे बदलुन ट्राॅफीजवळ केवळ चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी आणि सनरायझर्स हैद्राबादचा कर्णधार केन विलियमसन आहेत. बाकी सर्व कर्णधारांचे संघ आयपीएलमधून बाहेर गेले आहेत. ही ट्राॅफी नक्की कोणाला मिळणार हे आता ७ तासांनी स्पष्ट होणार आहे.

चेन्नई विक्रमी ७व्यांदा तर हैद्राबाद दुसऱ्यांदा आयपीएल फायनलमध्ये पोहचले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

लाॅर्ड्स कसोटी पाकिस्तानने जिंकली, इंग्लंडविरुद्ध मालिकेत १-० आघाडी

आयपीएल विजेते होणार मालामाल, मिळणार मोठे बक्षीस

त्या शाॅटवर षटकार नाही तर अष्टकारचं द्या!

आयपीएलमधील आजपर्यंतचा सर्वात खास विक्रम रैना आज करणार!

-तर धोनी करणार ४८ तासांत तो विक्रम आपल्या नावावर!

एबी डिव्हिलियर्सच्या नावाने कुणी दिली शेगांव संस्थानला देणगी?