पहा कोण होत्या त्या आजी ज्या करत होत्या मुंबई इंडियन्सच्या विजयासाठी प्रार्थना !!

काल झालेल्या आयपीएलच्या १० व्या परवाचा अंतिम सामना मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायन्ट यांच्यात झाला. हा सामना आता पर्यंतच्या सर्व आयपीएल अंतिम सामन्यात सर्वात जास्त अटीतटीचा झाला. मुंबई इंडियन्सने हा सामान केवळ १ का धावेने जिंकला. ४ चेंडूत ७ धावा हव्या असताना कॅमेरा एका वयस्कर महिलेवर गेला ज्या प्रार्थनेमध्ये गुंग होत्या. आणि एकदा कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे वारंवार कॅमेरा आजींवर येऊन ठेपत होता. काही क्षणातच हा फोटो सोशल मीडियावर वायरल झाला.

मुंबई इंडियन्सना जिंकण्याची २ कारणे म्हणजे जॉन्सनची उत्कृष्ट गोलंदाजी आणि या आजींची प्रार्थना असे चित्र सध्या सोशल मीडियाने उभे आहे

आता अभिषेक बचन्नने ट्विटरवर या आजी कोण आहेत याचा खुलासा केला आहे.


या आजी इतर कोणी नसून रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची सासू आणि मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांच्या आई आहेत, त्याचे नाव पूर्णिमा दलाल आहे.