आयपीएलमुळे आजपर्यंत झाले एवढे खेळाडू करोडपती

मुंबई  | आजपासून ११व्या इंडियन प्रीमियर लीगला सुरूवात होणार आहे. शेषराव वानखेडे स्टेडीअम, मुंबई येथे आज उद्धाटन समारंभानंतर एमएस धोनीची चेन्नई सुपर किंग्ज आणि रोहित शर्माची मुंबई इंडियन्स या संघात सलामीचा सामना होणार आहे. 

आजपर्यंत आयपीएलच्या सर्व पर्वात मिळून ६९४ खेळाडू खेळले आहेत. त्यातील तब्बल ३१६ खेळाडूंना आयपीएलमुळे करोडपती होता आले आहे. 

म्हणजे जवळपास आयपीएलमधील ४५.२४% खेळाडू हे या स्पर्धेमुळे करोडपती झाले. यातील अनेक खेळाडू हे अतिशय गरिब कुटूंबातून आलेले आहेत. 

आयपीएलमध्ये भाग घेतलेल्या ६९४ खेळाडूंना मिळून आजपर्यंत तब्बल ४२८४ कोटी रुपये देण्यात आले आहेत. 

यावर्षी आयपीएलमध्ये ८ संघातून एकूण १८५ खेळाडू खेळणार असून त्यात भारताचे एकूण १२५ खेळाडू भाग घेणार आहेत.

प्रत्येक संघात सरासरी १५ भारतीय खेळाडू खेळणार आहेत. त्यात दिल्लीचे आणि पंजाब १२ खेळाडू खेळणार आहेत. 

एकूण ६० परदेशी खेळाडूंमध्ये सर्वात जास्त खेळाडू हे आॅस्ट्रेलियाचे आहेत. तब्बल १४ आॅस्ट्रेलियन खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसतील.