पुणेकर क्रिकेटप्रेमींसाठी हे नक्कीच चांगले वृत्त नाही!

पुणे । पुण्यात होणारे आयपीएल ‘ प्ले ऑफ ‘ चे सामने आता कोलकाता येथे होणार आहे. हे सामने चेन्नई सुपर किंग्जचे सामने पुण्यात होण्याआधी येथे होणार असे घोषीत करण्यात आले होते.

पुण्यात आयपीएल एलिमिनेटरचा सामना २३ मे तर क्वाॅलिफायर-२चा सामना २५ मे रोजी होणार होते. परंतु पुण्याला चेन्नई सुपर किंग्जचे सामने मिळाल्यामुळे हे सामने आता कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर होणार आहेत.

पुण्याची स्टेडियमची क्षमता ही कोलकाताच्या इडन गार्डन्सपेक्षा अर्धीच आहे. इडन गार्डन्सवर ६६ हजार प्रेक्षक बसु शकतात तर पुण्यातील स्टेडियमवर ३७ हजार प्रेक्षक सामन्याचा आनंद घेऊ शकतात.

यामुळेही हा निर्णय आयपीएलच्या प्रशासकिय समितीने घेतल्याचे बोलले जात आहे.

पुण्यापासुन ४ तासांच्या अंतरावर असणाऱ्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर क्वाॅलिफायर-१चा सामना २२ मे तर अंतिम सामना २७ मे रोजी होणार आहे.

कोलकाता क्रिकेट असोशियशने याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –