आयपीएलमधील आजपर्यंतचे पर्पल कॅपचे मानकरी…!!

आयपीलच्या दहाव्या मोसमाला सुरवात होऊन नुकताच एक आठवडा झाला आहे आणि लगेचच क्रिकेट रसिकांनामध्ये चर्चा सुरु झाली आहे कि या वर्षी पर्पल कॅप कोण जिंकणार! नुकताच सन रायझर्स हेंद्राबादच्या संघाकडून खेळणाऱ्या अफगाणिस्थानातील फिरकी गोलंदाज रशीद खान याने पाच बळी घेऊन पर्पल कॅप आपल्या नावे केली आहे , त्याच्या मागोमाग रायझिंग पुणे सुपर जायंट या संघाचा फिरकी गोलंदाज इम्रान ताहिरही आहे , त्याने ही ५ बळी घेतले आहेत , पण कमी इकॉनॉमीने धाव दिल्यामुळे पर्पल कॅप आता तरी रशीदकडे आहे. पाहुयात महिला काही मोसमातील पर्पल कॅप विजेते आणि त्याची कामगिरी.

 

१. सोहेल तन्वीर ( २२ विकेट्स )
राजस्थान रॉयल्सकडून पहिल्या मोसमात खेळलेल्या पाकिस्तानी वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीरने पहिल्याच मोसमात आपली छाप सोडली . त्या मोसमात त्याने एकूण मिळून २२ गाडी बाद केले होते .त्यात त्याने चेन्नई विरुद्धच्या सामन्यात १४ धाव देऊन ६ गडी बाद कारण्याचाही समावेश आहे. हा विक्रम अजूनही त्याच्याच नावावर आहे. आदाम झाम्पाने मागील वर्षी एका सामन्यात ६ बळी घेतले होते पण त्याने जास्त रन दिले होते त्यामुळे हा विक्रम अजूनही अबाधित आहे .

 

२. रुद्रप्रताप सिंग ( २३ विकेट्स )

डेक्कन चार्जेर्सने २००८ चे आयपील जिंकले यामध्ये सिहांचा वाट होता तो म्हणजे डाव्या हाताचा भारताचा वेगवान गोलंदाज आर पी सिंगचा. त्याने ऍडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली उत्तम गोलंदाजी करत २३ विकेट्स घेतल्या. त्याची मोसमात इकॉनॉमीही खूप कमी म्हणजेच ७ ची होती. पर्पल कॅप आणि विजेते पद दोनीही एकाच संघाकडे येणाची ही पहिलीच वेळ होती , त्यानंतर असे मागील वर्षी झाले जेव्हा पर्पल कॅप आणि चषक दोनही हैद्राबादच्या संघाकडे गेले.

 

३. प्रग्यान ओझा ( २१ विकेट्स )

डेक्कन चार्जेर्सच्याच डाव्या हाथाने फिरकी गोलंदाजी करणाऱ्या भारताच्या प्रग्यान ओझ्याने तिसऱ्या मोसमात ही कामगिरी करून दाखवली होती , ओझा हा पहिला फिरकी गोलंदाज होता ज्याने पर्पल कॅप आपल्या नावावर केली. प्रज्ञान ओझाने या मोसमात २० च्या सरासरीने २१ विकेट्स काढल्या होत्या.

 

४. लसिथ मलिंगा ( २८ विकेट्स )

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज पहिल्या मोसमपासूनच मुंबईकडून चांगला खेळ दाखवत आला आहे. चौथ्या मोसमातही ६ च्या इकॉनॉमीने गोलंदाजी करत २८ विकेट्स घेतल्या होत्या. मलिंगा हा आयपीलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच १४३ विकेट्स घेणारा गोलंदाज आहे त्याच्या पाठोपाठ भारताचा फिरकी गोलंदाज अमित मिश्राने १२४ विकेट्स घेतल्या आहेत .

 

५. मोर्ने मॉर्केल ( २५ विकेट्स )
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मोर्ने मॉर्केलने दिल्लीकडून खेळताना १८च्या सरासरीने आणि ७ च्या इकॉनॉमी देऊन २५ गाडी बाद केले होते. त्याच्या या कामगिरीमुळेच देखील पाचव्या मोसमात प्रथम स्थान गाठता आले होते.

 

६. डवायन ब्रावो ( ३२ विकेट्स )

चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या या वेस्ट इंडिसच्या अष्टपैलू खेळाडूने २०१३च्या मोसमात १५च्या सरासरीने ३२ विकेट्स काढल्या होत्या. आता पर्यंत एका मोसमात एवढे बळी कोणीच घेतले नाहीत. त्याने या मोसमात आपल्या स्लो चेंडूवर बऱ्याच फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता.

 

७. मोहित शर्मा ( २३ विकेट्स )

पुन्हा एकदा चेन्नईच्याच संघाच्या गोलंदाजाने पर्पल कॅप आपल्या नावावर केली. मोहित शर्मा हा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला ज्याने पर्पल कॅप मिळवली .
त्याने सातव्या मोसमात २० च्या सरासरीने २३ विकेट्स घेतल्या.

 

८. डवायन ब्रावो ( २६ विकेट्स )

सलग ३ वर्ष चेन्नईने पर्पल कॅप आपल्या नावे केली , या आठव्या मोसमतही डवायन ब्रावोने चमकदार गोलंदाजी करत १७ सामन्यात २६ गडी बाद केले.
१६च्या सरासरीने त्याने विकेट्स घेतल्या व पर्पल कॅपचा मानकरी ठरला .

 

९. भुवनेश्वर कुमार ( २३ विकेट्स )

भारतात स्विंग गोलंदाज म्हणून ओळ्खला जाणारा आणि शेवटच्या ओव्हर्समध्ये उत्तम गोलंदाजी करणारा भुनेश्वरने मागील वर्षी २३ विकेट्स घेत पर्पल कॅप आपल्या नावर केली . त्याची इकॉनॉमी हि फक्त ७ ची होती. तसेच त्याना बांग्लादेशच्या मुस्ताफिझूरची हि खूप चांगली साथ लाभली. हैद्राबादने २०१६चे आयपील आपल्या नावावर केले त्यात महत्वाची कामगिरी भुवीने बजावली.