आजचा सामना जिंकणं हैद्राबादला पडू शकत महाग!

पुणे | आज सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज असा सामना होणार आहे. हा स्पर्धेतील ४६वा सामना आहे.

हा सामना जर हैद्राबाद जिंकले तर ते २० गुणांसह यावर्षीच्या साखळी फेरीच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान कायम राहिल.

कारण दुसऱ्या स्थानावरील चेन्नई सुपर किंग्ज जरी राहिलेले सर्व सामने जिंकले परंतु आज पराभुत झाले तर ते साखळी फेरी संपल्यावर दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकवर कायम रहातील.

परंतु आयपीएलमध्ये जो संघ साखळी फेरीत पहिल्या स्थानावर राहिला आहे त्या संघाला १० आयपीएलमध्ये केवळ दोनदाच विजेतेपद मिळवु शकला आहे.

जो संघ या यादीत दुसऱ्या स्थानी राहिला आहे तो सर्वाधिक यशस्वी संघ ठरला आहे. साखळी फेरीत दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या संघांनी २०११, २०१२, २०१३, २०१४ आणि २०१५ ला विजय मिळवला आहे.

पहिल्या स्थानावर राहिलेल्या संघाने २००८ आणि २०१७ला, तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या संघाने २०१० आणि २०१६ला तर चौथ्या स्थानावर  राहिलेल्या संघाने २००९ला विजय मिळवला आहे.

यामुळे साखळी गटात दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या संघापेक्षा अन्य कोणत्याही संघाला चांगली कामगिरी करता आलेली नाही.