बीसीसीआयला मिळणार तब्बल २,१९९ कोटी रुपये

इंडियन प्रीमियर लीगला नवीन टायटल स्पॉन्सर्स म्हणून पुन्हा जुनाच साथीदार लाभला आहे. २०१८ ते २०१२ या ५ वर्षांसाठी तब्बल २,१९९ करोड रुपये विवो या मोबाईल कंपनीने मोजले आहेत.

गेल्यावर्षीपेक्षा तब्बल ५५४% जास्त पैसे आयपीएल अर्थात बीसीसीआयला या करारातून मिळणार आहे. चीनची स्मार्टफोनमध्ये जगात आणि भारतात अग्रेसर असणाऱ्या विवो या कंपनीने पुन्हा एकदा ह्या करारात सारस्य दाखववून मोठी रक्कम मोजली आहे.

याची अधिकृत बातमी ही बीसीसीआयच्या ट्विटर अकाऊंटवरून आज दुपारी देण्यात आली आहे. गेल्या दोन मोसमात विवोच आयपीएल टायटल स्पॉन्सर्स होत. तेव्हा ते प्रत्येक वर्षाला १०० कोटी रुपये आयपीएलला मोजत होते. त्याआधी टायटल स्पॉन्सर्स असणारे पेप्सी प्रत्येंक मोसमासाठी ८० कोटी रुपये मोजत होते.

१०व्या मोसमा अखेर विवो बरोबरचा हा करार संपुष्ठात आल्यामुळे नव्याने निविदा मागवण्यात आल्या. इच्छूक कंपन्यांना २७जुलै पर्यंत टेंडर भरण्यासाठी सांगण्यात आले होते.

नवीन करारानुसार विवो प्रत्येक मोसमासाठी तब्बल ४३९.८ कोटी रुपये बीसीसीआयला मोजणार असल्याचं समजत.