देशात या २० शहरांमध्ये होणार २०१९चे आयपीएल

आयपीएल 2019 भारतातच होणार आहे. मात्र सगळ्या संघांना फक्त तीनच सामने घरच्या मैदानावर खेळता येणार आहेत. 23 मार्चपासून आयपीएलच्या या 12व्या हंगामाला सुरूवात होणार असून त्यासाठी 20 शहरांची अंतिम निवड करण्यात आली आहे.

या 20 शहरांमध्ये मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगलोर, मोहाली, जयपूर आणि हैद्राबाद यांचा समावेश तर आहेच पण त्याचबरोबर पुणे, विशाखापट्टणम, रांची, कटक, राजकोट, तिरूअनंतपुरम, कानपूर, लखनऊ, गुवाहाटी, रायपूर, इंदोर आणि धरमशाला येथेही आयपीएलचे सामने होण्याची शक्यता आहे.

आयपीएलच्या वेळी भारतात लोकसभेच्या निवडणुका होत असल्याने त्यांच्या तारखा स्पष्ट झाल्यावर आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे.

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, आयपीएलचे वेळापत्रक 2 किंवा 3 फेब्रुवारी पर्यंत तयार होईल. यासाठी बीसीसीआयने सामन्यांचे ठिकाण हलवण्याची तयारी दर्शवली आहे. बीसीसीआयने फ्रॅंचायजींना याबद्दल आधीच कल्पना दिली आहे.

या 20 शहरांमधील राज्य सरकारने खेळाडूंना सुरक्षा देण्यास संमती दर्शवली आहे. जर असे नसते झाले तर यंदाचे आयपीएल दुबई किंवा दक्षिण आफ्रिकेमध्ये हलवावे लागले असते असे बीसीसीआयने म्हटले होते.

देशातील या २० शहरात होणार आयपीएल २०१९चे सामने-

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडिया विरुद्धच्या वन-डे मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का!

ऑस्ट्रेलिया संघ परतणार १९८० च्या दशकात!

२०१९ विश्वचषकासाठी कोणत्याही खेळाडूच्या जागेबद्दल नाही खात्री!

आता टीम इंडिया खेळू शकते अमेरिकेबरोबर अमेरिकेत क्रिकेट, जाणून घ्या कारण