ना धोनी- ना विराट, आयपीएलमध्ये हवा तर याच खेळाडूची

बेंगलोर | भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा स्टार कर्णधार एमएस धोनीने काल आपल्या संघाला आयपीएलमध्ये एकहाती सामना जिंकून दिला. अगदी शेवटपर्यंत मैदानावर रहात त्याने षटकार खेचून विजय साकारला.

यामुळे धोनीला कालच्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याचा हा आयपीएलमधील १४वा सामनावीराचा पुरस्कार होता. 

आयपीएलमध्ये सर्वाधिक चर्चा ही कायम धोनीची होते. तसेच सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये कायम विराट, रैनाचे नाव घेतले जाते. परंतू सर्वाधिक सामनावीर  पुरस्कार जिंकण्याचा विक्रम मात्र ख्रिस गेलच्या नावावर आहे. 

गेलने २० वेळा हा पुरस्कार मिळवला आहे तर या यादीत दुसऱ्या स्थानावर युसूफ पठाण अाणि एबी डिविलियर्स हे १६ सामनावीर पुरस्कारांसह आहेत. 

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामनीवीर पुरस्कार मिळवणारे खेळाडू- 

२०- ख्रिस गेल

१६- युसूफ पठाण, एबी डिविलियर्स 

१५- रोहित शर्मा, डेविड वार्नर

१४- एमएस धोनी, सुरेश रैना

१३- गौतम गंभीर

१२- माईक हसी, अजिंक्य रहाणे

महत्त्वाच्या बातम्या –

-अबब! पुढील ५ वर्षात होणार क्रिकेटचे ६ वर्ल्डकप 

-संपूर्ण वेळापत्रक: असे होतील भारताचे विश्वचषक 2019चे सामने 

-यारे या सारे या! आता १०४ देश खेळणार आंतरराष्ट्रीय टी२० सामने 

-ना धोनी- ना विराट, आयपीएलमध्ये हवा तर याच खेळाडूची 

-धोनी चाहत्यांसाठी ही आहे महत्त्वाची आकडेवारी 

-या कारणामुळे विराटला झाला 12 लाख रूपयांचा दंड 

-बीसीसीआयची फसवणूक करणारा खेळाडू आयपीएलमध्ये चमकला

-पराभव झाला तरीही हा विक्रम करत कोहली भाव खाऊन गेला 

-असा एक कारनामा ज्यासाठी टी२०मध्ये खेळाडू करतात जिवाचे रान