Maha Sports
India's Only Marathi Sports News Magazine

IPL 2018: धोनीसह हे २ मोठे खेळाडू चेन्नई सुपर किंग्स करणार कायम !

0 324

मागील दोन वर्ष बंदी घालण्यात आलेला चेन्नई सुपर किंग्स संघ यावर्षी आयपीएलमध्ये पुनरागमन करणार आहे. त्यामुळे चेन्नई व्यवस्थापन एमएस धोनी, सुरेश रैना आणि अष्टपैलू रवींद्र जडेजाला पुन्हा संघात घेणार असल्याची चर्चा आहे.

आयपीएल रिटेन्शन पॉलिसीनुसार मागील दोन वर्ष बंदी घालण्यात आलेले चेन्नई सुपर किंग आणि राजस्थान रॉयल्स लिलावापूर्वी आणि आणि लिलावात राइट टू मॅच वापरून २०१५ आणि २०१६ मध्ये गुजरात आणि पुण्याकडून खेळलेल्या त्यांच्या जास्तीतजास्त ५ खेळाडूंना कायम ठेवू शकतात. त्यानुसारच चेन्नई व्यवस्थापन धोनी, जडेजा आणि रैनाला पुन्हा संघात घेण्याची शक्यता आहे.

त्याबरोबरच राइट टू मॅच कार्ड वापरून ड्वेन ब्रावो आणि आर अश्विनलाही चेन्नई संघात परत घेऊ शकतात.

आयपीएल संघांना त्यांचे कोणते खेळाडू संघात कायम राहणार आहेत त्यांची नावे हे जाहीर करण्याची ४ जानेवारी ही शेवटची तारीख आहे. यांनतर बाकी खेळाडूंचा लिलाव बंगळुरूमध्ये २७ आणि २८ जानेवारी असे दोन दिवस होणार आहे. तसेच यावर्षीचा लिलाव मोठा असेल. आयपीएलचा यावर्षीचा ११ वा मोसम असणार आहे.

Comments
Loading...
%d bloggers like this: