भावानिक होत विराट कोहलीने ऑरेंज कॅप नाकारली!

मुंबई| भारताचा कर्णधार विराट कोहली नेहमीच उत्कृष्ट फलंदाजीसाठी आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या विजय मिळवण्याच्या जिद्दीसाठी ओळखला जातो. पण त्याचबरोबर परवा विराटचा आणखी एक गुण सर्वांसमोर आला आहे. 

मुंबई इंडियन्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात 17 एप्रिलला झालेल्या आयपीएलच्या सामन्यात विराटने नाबाद 92 धावा केल्या होत्या. यामुळे तो यावर्षीच्या मोसमात आत्तापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. यासाठीच त्याला ऑरेंज कॅप प्रदान करण्यात आली होती. 

परंतू, विराटने ही ऑरेंज कॅप घेण्यास नकार दिला. या सामन्यात मुंबईने 47 धावांनी विजय मिळवला होता. हा सामना संपल्यानंतर जेव्हा विराटला ही कॅप देण्यात आली, तेव्हा तो म्हणाला, “आत्ता मला नाही वाटत की ऑरेंज कॅप घालण्याची ही योग्य वेळ आहे. कारण माझ्यासाठी ही महत्वाचे नाही.”

विराटने आयपीएल 2018 मध्ये आत्तापर्यंत 4 सामन्यात 201  धावा केल्या आहेत. 

या सामन्यात विराटला बाकी फलंदाजांनी साथ न दिल्यामुळे बेंगलोरला पराभव स्विकारावा लागला होता. या पराभवामुळे विराटने ऑरेंज कॅप नाकारली आहे. 

याच सामन्यात विराट आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.  विराटने 153 सामन्यात 38. 17 च्या सरासरीने 4619 धावा केल्या आहेत. 

महत्वाच्या बातम्या: