एशियन गेम्स: भारताला कबड्डीत पराभूत करत इराणच्या महिलांनी रचला इतिहास

18 व्या एशियन गेम्समध्ये शुक्रवारी (24 आॅगस्ट) महिला कबड्डीच्या अंतिम फेरीत भारतीय महिला संघाला इराणच्या महिला संघाने 27-24 अशा फरकाने पराभूत करत पहिल्यांदाच कबड्डीत सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

अतीतटीच्या झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या सत्रात 13-11 अशी आघाडी घेतली होती. भारतीय कर्णधार पायल चौधरी, रणदीप कौर खेहरा आणि रितू नेगी यांनी चांगली कामगिरी केली होती.

मात्र दुसऱ्या सत्रात इराणच्या महिलांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. सामन्याच्या 23 व्या मिनिटाला इराण संघाने भारतीय संघाला आॅल आऊट केले.

त्यानंतर 21-25 अशी पिछाडी असताना भारताकडून अष्टपैलू साक्षी कुमारीने सुपर रेड करत ही पिछाडी 24-25 अशी कमी केली. पण नंतर इराणची रेडर गझलने बोनस पॉइंट घेतला आणि साक्षीला इराणच्या बचावपटूंनी घेरत सामना 24-27 असा जिंकला.

या सामन्यात इराण संघाकडून अष्टपैलू खेळ पहायला मिळाला तर काही पंचांचे निर्णय भारताच्या विरोधात गेले.

एशियन गेम्सच्या इतिहासात भारतीय संघाने पहिल्यांदाच सुवर्णपदक गमावत रौप्यपदक मिळवले आहे. महिला संघाप्रमाणे इराणच्या पुरुष संघानेही भारतीय पुरुष संघाला उपांत्य फेरीत गुरुवारी (23 आॅगस्ट) पराभूत केले होते.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: हिना सिद्धूला नेमबाजीत कांस्यपदक

विराट कोहलीप्रमाणेच हार्दिक पंड्याही होता सामनावीराचा तितकाच दावेदार

विराट कोहलीमुळे या संघाच्या प्रशिक्षकांना डच्चू?