आयर्लंड, अफगाणिस्तान संघांना कसोटी क्रिकेटचा दर्जा

आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट असोशिएशनने आयर्लंड, अफगाणिस्तान संघांना पूर्णवेळ सदस्यत्वाचा तसेच कसोटी क्रिकेटचा खेळणाऱ्या संघांचा दर्जा दिला. आयसीसीच्या लंडन येथे सुरु असलेल्या बैठकीत अगदी शेवटच्या क्षणी हा घेण्यात आला.

या दोनही संघांना कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळविण्यासाठी मतदान घेण्यात आले. त्यात दोनही देशांच्या बाजूने मतदान झाल्यामुळे आता आयसीसीच्या कसोटी खेळणाऱ्या देशांची संख्या १० वरून १२ झाली आहे.

ह्या दोन देशांना आयसीसीकडून एकदिवसीय आणि टी२० क्रिकेट प्रकारात याआधीच मान्यता मिळाली होती. यांनी पूर्णवेळ सदस्य असलेल्या संघांविरुद्ध कायमच चांगला खेळ केला आहे.

सध्या जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी असणाऱ्या आयर्लंड संघाने २०११ ला विश्वचषकात इंग्लंडला तर २०१५ विश्वचषकात पाकिस्तानला पराभूत केले होते.

तर सध्या १० क्रमांकावर असलेल्या अफगाणिस्तानने वेस्ट इंडिज सोबत एकदिवसीय आणि टी२० मालिका बरोबरीत सोडविली.


आयसीसीने यापूर्वी तब्बल १७ वर्षांपूर्वी २००० साली बांग्लादेश संघाला कसोटी दर्जा दिला होता.