हा संघ करणार कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण

आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार आयर्लंडचा संघ एप्रिल २०१८ मध्ये पाकिस्तान विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. आयसीसीने आयर्लंडबरोबरच अफगाणिस्तान संघालाही जूनमध्ये कसोटी संघाचा दर्जा दिला आहे.

आयसीसीच्या प्रसिद्धी पत्रकानुसार पाकिस्तानचा पुढचा कसोटी सामना आयर्लंड संघाविरुद्ध होणार आहे. पाकिस्तान पुढच्या वर्षी २ कसोटी सामन्यांसाठी इंग्लंड दौरा करणार आहे. त्याच्या आधी ते आयर्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळतील असे वृत्त आहे.

पाकिस्तान संघाची सध्या कसोटी क्रमवारी घसरली आहे. नुकत्याच श्रीलंकेविरुद्ध खेळलेल्या दोन कसोटी सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे ते कसोटी क्रमवारीत ७व्या स्थानावर घसरले आहेत.

आयर्लंडचे सीईओ वॉरेन डुओट्रॉम म्हणाले की ” आमच्या संघाला कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाल्यामुळे आमच्या खेळाडूंना इंग्लंड संघासाठी खेळण्याऐवजी स्वतःच्या देशासाठी खेळण्याची संधी मिळाली आहे.”

आयर्लंड आणि अफगाणिस्तान हे अकरावे आणि बारावे संघ आहेत जे कसोटी क्रिकेटचे सामने खेळातील.