का होतेय इंग्लंड-पाकिस्तान कसोटी सामन्यातील या फोटोची एवढी चर्चा

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यांतील पहिला सामना लॉर्डस् क्रिकेट ग्राऊंडवर झाला. हा सामना पाकिस्तान संघाने चौथ्याच दिवशी 9 विकेट्सने जिंकला. 

यावेळी बॉलीवूड अभिनेता इरफान खान या कसोटी सामन्याचा आनंद घेताना नजरेस आला. त्याचा हा सामना बघतानाचा फोटो सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

नुकताच इरफान न्युरोनडोक्राईन ट्युमरमधून बरा होत आहे. मार्चमध्ये निदान झालेल्या या ट्युमरवर उपचार इरफानने युनायटेड किंगडममध्ये घेतले. काही महिन्यांआधीच इरफानने ही ट्युमरबद्दलची दुर्दैवी बातमी ट्विटरवरून शेयर केली होती.

“आत्ताच मला न्युरोनडोक्राईन ट्युमरचे निदान झाल्याचे समजले. हा क्षण माझ्यासाठी खूप कठीण आहे. मात्र माझ्या आसपास असलेल्या प्रेम आणि शक्ती अशा वातावरणामुळे माझ्यात एकप्रकारच्या आशा निर्माण झाल्या आहेत”, असे त्याने ट्विट केले होते.

झैनाब अब्बास या पाकिस्तानच्या स्पोर्ट्स अॅंकरने इरफानचा हा फोटो ट्विटरवरून शेयर केला. झैनाब ही इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यांचे समालोचन करत आहे.

प्रेक्षकांमधील अली नोमी यानेसुध्दा इरफान हा सामना बघण्यास स्टेडियममध्ये उपस्थित होता असे स्पष्ट केले. याबद्दल त्याने ट्विटही केले.

“तो माझ्या समोर बसला होता. काही लोक त्याला फोटो काढण्यासाठी विचारत होते. मात्र त्याने फोटो काढण्यास नकार दिला. मला वाटते तो त्याच्या प्रकृतीमुळे फोटो काढण्यास नकार देत होता. कारण तो खूपच अशक्त दिसत होता”,असे अलीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले.

वाचा प्रो-कबड्डी २०१८च्या खास बातम्या- 

संपुर्ण यादी- दुपारच्या सत्रात प्रो-कबड्डीमध्ये लागल्या या खेळाडूंवर बोली

आईने केलेली प्रार्थना कामी आली- रिशांक देवडिगा

-संपुर्ण यादी- प्रो कबड्डी लिलावातील सकाळच्या सत्रातील सर्व बोली

-४३ वर्षीय खेळाडूला यु-मुंबाने प्रो-कबड्डीत मोजले तब्बल ४६ लाख

-महाराष्ट्राच्या विराज लांडगेला प्रो-कबड्डी लिलावात दुसऱ्या दिवशी पहिली बोली

-संपुर्ण यादी- पहिल्याच दिवशी प्रो-कबड्डी लिलावात 6 खेळाडू करोडपती

-हा खेळाडू ठरला प्रो-कबड्डी इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

-प्रो-कबड्डीत 1 कोटी बोली लागलेला रिशांक देवडिगा पहिला महाराष्ट्रीयन खेळाडू