चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात होणार एक बदल?

साउथॅंप्टन | भारतीय संघ गुरुवारपासून सुरु होत असलेल्या चौथ्या कसोटीसाठी सज्ज झाला आहे. मालिकेत भारत १-२ असा पिछाडीवर असला तरी तिसऱ्या कसोटीत केलेल्या चांगल्या खेळामुळे संघाचे मनोधैर्य नक्कीच वाढले आहे.

त्यामुळे भारतीय संघ तिसऱ्या कसोटी सामन्यात जो संघ खेळला आहे तोच संघ चौथ्या कसोटी सामन्यात खेळविण्याची चिन्हं आहेत. परंतु या मालिकेत भारतीय संघातून सर्वाधिक यशस्वी ठरलेला तिसरा गोलंदाज आर अश्विन या सामन्यात न खेळण्याची काहीशी शक्यता आहे.

मांडीचा स्नायु दुखावल्यामुळे अश्विनच्या सहभागाबद्दल मोठी चर्चा आहे. नाॅटिंगहॅम कसोटीनंतर अश्विन दुखापतग्रस्त दिसत होता. परंतु त्याने दोन दिवसांत सराव शिबीरात भाग घेतला आहे.

जर दुखापतीमुळे अश्विन खेळला नाही तर त्याच्या जागी फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजाला संधी मिळण्याची शक्यता आहे.

विराट कोहलीचा हा कर्णधार म्हणुन ३९वा सामना आहे. यातील प्रत्येक लागोपाठच्या दोन सामन्यात त्याने संघात एकतरी बदल केला आहे. त्यामुळे या सामन्यात तो काय करतोय याकडे क्रिकेट जाणकारांचे लक्ष लागले आहे.

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात हा संघ खेळला होता-
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे, हार्दिक पांड्या, रिषभ पंत (यष्टिरक्षक), आर आश्‍विन, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रित बुमरा

भारताकडे आहेत हे अन्य पर्याय-

रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक, करुण नायर, पृथ्वी शॉ, शार्दुल ठाकूर, हनुमा विहारी, उमेश यादव

महत्त्वाच्या बातम्या-

 एशियन गेम्स: भारताला मिश्र रिलेत ऐतिहासिक रौप्यपदक

 …तुम्ही क्रिकेटमधील धावांप्रमाणे हाॅकीत गोल करता!!!

भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटीत या ५ विक्रमांकडे दुर्लक्ष…

 आफ्रिदीला ‘बूम-बूम’ हे फेमस टोपण नाव देणारा कोण होता तो भारतीय खेळाडू

लक्ष्मणच्या ड्रीम ११मध्ये मुरली विजयसह काही धक्कादायक नावे

-कोहली आता तरी तो ‘नकोसा’ विक्रम टाळणार का?

-विराटसाठी चौथा कसोटी सामना खास, होणार एक ‘किंग’ रेकाॅर्ड

-एशियन गेम्स: नीना वराकिलने लाँग जम्पमध्ये मिळवले रौप्यपदक

-भारतीय संघासाठी ही आहे दिवसातील सर्वात मोठी गोड बातमी