या कारणामुळे भुवनेश्वर कुमार माध्यमांवर बरसला

भारतीय संघातील स्विंग मास्टर या नावाने ओळखला जाणारा गोलंदाज भुवनेश्वर कुमारला एका बातमीचा चांगलाच त्रास झाला आहे. त्यामुेळ त्याने आपल्या ट्विटर हॅन्डलवरून माध्यमांना चुकीच्या बातम्या पसरू नका असे सुनावले आहे.

मुंबईतील एका वृत्तपत्राने रोहित शर्मा आणि भुवनेश्वर कुमार हे दोघेही वडिल होणार असल्याचे वृत्त् प्रसिद्ध केले होते. त्यावर तो चांगलाच नाराज झाला आहे.

” अजून एक चुकीची माहिती माध्यमांनी पसरवली आहे. एखादीगोष्टी विषयी अधिकृतरित्या माहिती नसताना वैयक्तिक गोष्टींची माहिती पसरवणे नैतिकतेला धरून नाही.” असे भुवनेश्वर कुमारने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

भुवनेश्वर कुमार भारतीय संघातील महत्वाचा वेगवान गोलंदाज आहे. भुवनेश्वर अशिया कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात खेळला होता. त्यानंतर त्याला विंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. विंडिजविरूद्धच्या पहिल्या दोन वन-डे सामन्यासाठी देखील विश्रांती देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-