धोनी धाव घेताना ताशी एवढ्या वेगाने धावतो !

0 524

गुवाहाटी । भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी त्याचे यष्टिरक्षण, सामना संपवायची ताकद, त्याच्याकडे कर्णधार म्हणून असलेली अनोखी कौशल्य यामुळे ओळखला जातो. असच आणखी एक खास कौशल्य धोनीकडे आहे ज्याची नेहमी चर्चा होते ते म्हणजे धोनी धाव घेताना वेगवान धावतो ते.

आज गुवाहाटी टी२० सामन्यातील केदार जाधव आणि एमएस धोनी हे २ धाव घेताना किती वेगाने धावतात याचा एक खास विडिओ शेअर केला आहे. याचे ताशी विश्लेषण करणारा विडिओ स्टार स्पोर्ट्स इंडियाने आपल्या पेजवर शेअर केला आहे.

ज्यात धोनी पहिली धाव घेताना अतिशय वेगाने सुरुवात करतो. त्याचे तेव्हा हे स्पीड अंदाजे ताशी ३१ किलोमीटर असते. अर्ध्या खेळपट्टीवर गेल्यावर हा स्पीड थोडा कमी होतो. तो अंदाजे २६ पर्यंत जातो. दुसरी धाव घेताना धोनी आपला स्पीड हळूहळू वाढवत नेत धाव पूर्ण करताना ३१वर नेतो.

यावेळी दुसऱ्या बाजूला असणाऱ्या खेळाडूचा वेग हा अंदाजे ताशी २६ किलोमीटर असतो. केदार जाधव आणि धोनी यांच्यातील हा वेग यात दाखवण्यात आला आहे. परंतु हे सर्व करताना धोनी डेंजर एन्ड अर्थात ज्या बाजूला चेंडू फेकला जात आहे त्या बाजूला धावतो हे दिसते.

 

Comments
Loading...
%d bloggers like this: