Video: यष्टीरक्षक इशान किशनची एमएस धोनी स्टाईल किपिंग

4 सप्टेंबरपासून सुरु झालेल्या दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात इंडिया रेड संघाचा यष्टीरक्षक इशान किशनने ‘धोनी स्टाईल’मध्ये फलंदाजाला धावबाद करण्याचा प्रयत्न केला आहे.

हा सामना इंडिया रेड विरुद्ध इंडिया ब्ल्यू संघात सुरु आहे. या सामन्यात मंगळवारी एका क्षणी इशान किशनने स्टंपकडे पाठ करुन उभा असताना फलंदाजाला धावबाद करण्यासाठी त्याने पायांच्यामधून चेंडू थेट स्टंपच्या दिशेने फेकला.

पण चेंडू स्टंपवर आदळण्यापूर्वीच फलंदाज क्रिजच्या आत पोहचला होता. मात्र इशानची ही कृती पाहुन अनेकांना भारताचा यष्टीरक्षक एमएस धोनीची आठवण झाली. धोनीने अनेकदा अशा प्रकारे फलंदाजांना धावबाद केले आहे.

इशानचा हा व्हिडिओ बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच त्याला कॅप्शन देताना म्हटले आहे की ‘इशान किशन धोनीचे अनुकरण करतानाचा क्षण’

या सामन्यात पहिल्या दिवसाखेर इंडिया ब्ल्यूने पहिल्या डावात 5 बाद 260 धावा केल्या आहेत.

इशान दुलीप ट्रॉफीच्या आधी भारत ‘अ’, ‘ब’, आॅस्ट्रेलिया अ आणि दक्षिण आफ्रिका अ संघात पार पडलेल्या चौरंगी मालिकेत खेळला आहे.

त्याने आत्तापर्यंत 32 प्रथम श्रेणी सामन्यात खेळताना 41.11 च्या सरासरीने 2097 धावा केल्या आहेत. यात त्याने 11 अर्धशतके आणि 4 शतके केली आहेत. तसेच त्याने यात यष्टीमागे 58 झेल आणि 9 यष्टीचीत केले आहे.

त्याचबरोबर तो यावर्षी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला असून बऱ्याचदा तो धोनीशी चर्चा करतानाही दिसला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

भारताचा वेगवान गोलंदाज आरपी सिंगची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

राफेल नदालचा युएस ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश

वृद्धिमान सहाने ट्विट केलेल्या गमतीशीर फोटोवर स्टीव्ह स्मिथने दिली अशी प्रतिक्रिया…