इशांत शर्माने अशी काय कामगिरी केली ज्यामुळे पुजाराला केलं जातय ट्रोल!

चेम्सफोर्ड | काऊंटी क्रिकेटमध्ये इसेक्स विरुद्ध याॅर्कशायर सामन्यात आज पहिल्या दिवशी याॅर्कशायरचा संपुर्ण डाव ५० धावांत संपुष्टात आला.

विशेष म्हणजे याॅर्कशायरकडून कसोटी क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू चेतेश्वर पुजारा, इंग्लंडचा कर्णधार जो रुट तसेच जाॅनी ब्रेर्स्टो हे खेळत आहेत.

पुजारा आज ९ धावांवर बाद झाला. काऊंटी क्रिकेटचा २०१८चा हंगाम या खेळाडूसाठी अतिशय खराब ठरला. ३ सामन्यात या खेळाडूला अजूनही विशेष काही करता आले नाही. त्याने गेल्या ३ सामन्यात २, १८, ७, ६ आणि ९ अशा धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ही ८.४ ची आहे.

तर इशांत शर्माने मात्र ३ सामन्यात २२, ६६, नाबाद ७ आणि ६ अशा धावा केल्या आहेत. त्याची सरासरी या सामन्यांत ३३.६६ची आहे.

सारखेच सामने खेळूनही इशांतने पुजारापेक्षा ५९ धावा जास्त केल्या आहेत. इशांत गोलंदाजीतही ३ सामन्यात ८ विकेट्स मिळाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –