इशांत शर्माने सांगितला धोनी आणि कोहलीमधील फरक

भारताचा वेगवान गोलंदाज इंशांत शर्माने नुकतीच नोएडामधील बेनेट विद्यापीठाला एका क्रिकेट वर्कशॉप निमित्त भेट दिली. या भेटीत त्याने खेळाबद्दल आणि फिटनेसबद्दल त्याची मते मांडली.

यावेळी इंशांतला एका विद्यार्थ्याने एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वातील फरक विचारला. त्यावेळी इंशांतने साधेपणाने उत्तर देताना सांगितले की, “धोनी शांत आहे आणि विराट आक्रमक आहे.”

याबरोबरच इशांतला विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत, त्यात एका विद्यार्थ्याने विचारले की इशांत मैदानात चूक झाल्यावर त्याचा सामना कसा करतो? यावर इंशांतने विद्यार्थ्यांना सल्ला दिला की, “तुम्ही चूकांमधून शिकत असता त्यामुळे तुम्ही चुका करायला घाबरू नये.”

याबरोबरच इशांत म्हणाला की विद्यार्थ्यांसाठी फिटनेस वर्कशॉप महत्त्वाचे आहेत. तसेच तो म्हणाला, “जेव्हा मी शाळेत होतो, तेव्हा कोणताही क्रिकेटपटूने आमच्या इंस्टीट्यूटला भेट द्यायला आला नव्हता. पण तरुण खेळाडूंना त्यांच्या आवडत्या खेळाडूंना भेटण्याची संधी मिळायला हवी”

क्रिकेट हा अतिशय लोकप्रिय खेळ आहे, पण त्याचबरोबर क्रिकेटपटू बनू इच्छिणाऱ्या खेळाडूंसाठी तो तणावपूर्ण आहे.  तरुण खेळांडूवर क्रिकेट शिकून कमीतकमी राष्ट्रीय संघात नाही पण आयपीएलमध्ये तरी खेळावे असा अनेक पालक दबाव टाकतात. त्यामुळे तरुण वयातच क्रिकेटपटू तणाव हातळण्यास शिकतात.”

इशांतला यावर्षी आयपीएसमध्ये कोणत्याही संघाने सामील करुन घेतले नव्हते, त्यामुळे तो इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळायला गेला होता. यात त्याने चांगली कामगिरी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या:

-टी20मध्ये केल्या २७० धावा, आयसीसी म्हणते तरीही हा विक्रम नाही

-गांगुली म्हणतो, विराट तू वनडेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी कर!

-जबरदस्त गोलंदाजी करणाऱ्या भारताच्या युवा गोलंदाजाचे मास्टर ब्लास्टरकडून कौतुक