विंडीजविरुद्ध ५ विकेट्स घेत इशांत शर्माने केली हरभजन, कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी

22 ऑगस्टपासून वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. सर विवियन रिचर्ड्स स्टेडीयमवर सुरु असलेल्या या सामन्यात काल(23 ऑगस्ट) दुसऱ्या दिवशी भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने 5 विकेट्स घेत एका खास विक्रमाची बरोबरी केली आहे.

त्याने काल वेस्ट इंडीजच्या पहिल्या डावात क्रेग ब्रेथवेट(14), रोस्टन चेस(48), शाय होप(24), शिमरॉन हेटमेयर(35), केमार रोच(0) यांच्या विकेट्स घेतल्या. ही इशांतची वेस्ट इंडीजमध्ये कसोटीत 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची तिसरी वेळ आहे.

त्यामुळे त्याने वेस्ट इंडीजमध्ये कसोटीत सर्वाधिकवेळा 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याच्या यादीत अव्वल क्रमांकावर विभागून असणाऱ्या सुभाष गुप्ते, अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांची बरोबरी केली आहे. या तिघांनीही वेस्ट इंडीजमध्ये प्रत्येकी 3 वेळा 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच कसोटीमध्ये एका डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची इशांतची ही एकूण 9 वी वेळ होती.

या सामन्यात वेस्ट इंडीजने पहिल्या डावात दुसऱ्या दिवसाखेर 8 बाद 189 धावा केल्या आहेत. त्यांच्याकडून रोस्टन चेसने 48 धावा करत चांगली लढत दिली होती. पण त्याला इशांतने बाद केले. दुसऱ्या दिवसाखेर वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डर 10 धावांवर तर मिगुएल कमिन्स शून्य धावेवर नाबाद खेळत आहेत.

तत्पूर्वी भारताने पहिल्या डावात सर्वबाद 297 धावा केल्या. भारताकडून अजिंक्य रहाणेने 81 आणि रविंद्र जडेजाने 58 धावांची अर्धशतकी खेळी केली. विशेष म्हणजे जडेजाला 8 व्या विकेटसाठी इशांतने चांगली साथ देताना त्याच्याबरोबर 60 धावांची भागीदारी रचली. इशांतने 19 धावा केल्या.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

का झाला एमएस धोनी राजकीय नेता, जाणून घ्या यामागील खरे कारण

काय सांगता! एकाच टी२० सामन्यात शतक आणि ८ विकेट्स, भारताच्या कृष्णप्पा गॉथमचा पराक्रम

आज आहेत या दोन भारतीय महिला क्रिकेटपटूंचे वाढदिवस!