ISL 2018: बेंगलुरू विरुद्ध कोलकातामध्ये होणाऱ्या सामन्यांच्या वेळापत्रकात बदल

बेंगलुरू। सध्या सुरू असलेल्या हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) बेंगलुरू एफसीचे अॅटलेटिको दी कोलकाता विरुद्ध होणाऱ्या घरच्या मैदानावरील सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहे.

श्री कांतिरवा स्टेडियमय हे बेंगलुरूचे घरचे मैदान आहे. पण या मैदानावर कर्नाटकच्या सरकारला कन्नडा दिवसाची तयारी करायची असल्याने हा बदल करण्यात आला आहे.

बेंगलुरू हे 31 ऑक्टोबरला कोलकाता विरुद्ध श्री कांतिरवा स्टेडियमयवर खेळणार होते आणि मग ते 13 डिसेंबरला बाहेरील सामने खेळण्यास कोलकाताला जाणार होते. मात्र आता त्यांना आधी 31 ऑक्टोबरला कोलकाताला जावे लागेल आणि नंतर 13 डिसेंबरला घरच्या मैदानावर कोलकाता विरुद्ध खेळावे लागणार आहेत.

या दोन्ही संघानी आतापर्यंत या चालू स्पर्धेत दोन सामने खेळले असून बेंगलुरूला एका तर कोलकातला दोन्ही सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

मेस्सीच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वांत मोठी खुषखबर….