टीसीएस, सायमनटेक संघाचे प्रथम व्हिन्टेज आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत शानदार विजय

पुणे: टीसीएस, सायमनटेक संघांनी प्रथम व्हिन्टेज आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.

कटारिया हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील पहिल्या लढतीत टीसीएस संघाने बीएनवाय मेलन संघावर ११८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. टीसीएस संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद २२९ धावांपर्यंत मजल मारली. यात मयंक जसोरेने ४० चेंडूंत ९ चौकार व ८ षटकारांसह ९४ धावा केल्या, तर तेजपालसिंगने २१ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ४७ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना बीएनवाय मेलन संघाला १८.१ षटकांत ९ बाद १११ धावाच करता आल्या. मेलन संघाचा प्रकाशकुमार दुखापतीमुळे मैदानात येऊ शकला नाही. मेलन संघाकडून दीपक वसुदेवन याने ४२ चेंडूंत नाबाद ५० धावा केल्या.

दुस-या लढतीत सायमनटेक संघाने यूबीएस संघावर ९ गडी राखून सहज मात केली. सायमनटेक संघाच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून यूबीएस संघाला ३ बाद १२९ धावांत रोखले. सायमनटेक संघाने विजयी लक्ष्य १५.३ षटकांत १ गडीच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले.

संक्षिप्त धावफलक –

१) टीसीएस – २० षटकांत ५ बाद २२९ (ंमयंक जसोरे ९४, तेजपालसिंग ४७, गौरवसिंग ३१, शांतनू नाडकर्णी २१, अक्षय भोंगळे ४-३१, अविरल शर्मा १-३७) वि . वि. बीएनवाय मेलन – १८.१ षटकांत ९ बाद १११ (दीपक वसुदेवन नाबाद ५०, अभय पी. ३-२३, अभिनव कालिया २-१३, गणेश शिंदे २-९).

२) यूबीएस – २० षटकांत ३ बाद १२९ (अधिभ गजभिये ६९, चेतन झाडे नाबाद ३०, निखिल भोगले २-१४, जयदीप पाटील १-४३) पराभूत वि. सायमनटेक – १५. ३ षटकांत १ बाद १३२ (हृषीकेश पटवर्धन नाबाद ४५, अमित सिंघल ३८, सानू श्रीनिवासन नाबाद ३३, अधिभ गजभिये १-२३).