Video: मला माफ करा असे म्हणत भर पत्रकार परिषदेत स्मिथ ढसाढसा रडला

टीम अाॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथ आज दक्षिण आफ्रिकेवरून परतल्यावर माध्यमांना सामोरे गेला. यावेळी स्मिथला भर पत्रकार परिषदेत रडू कोसळले.

स्मिथवर क्रिकेट अाॅस्ट्रेलियाने १२ महिन्यांची बंदी घातली आहे.

माझे संघ सहकारी, चाहते आणि जगातील सर्व क्रिकेटप्रेमी आणि अाॅस्ट्रेलियाचे सर्व नागरीकांची मी मनापासून माफी मागतो. ” असे तो आज पत्रकार परिषदेत म्हणाला.

मी सोडून याला कुणीही जबाबदार असल्याचे वक्तव्य स्मिथने यावेळी केले आहे.

“मी संघाचा कर्णधार होतो आणि ही माझी जबाबदारी होती. जे काही घडल त्याला मी जबाबदार आहे. ” असे तो म्हणाला.

“माझी चूक झाली आहे. त्यामुळे जे नुकसान झाले आहे त्याची सर्व भरपाई होईल त्या मार्गाने करायला तयार आहे.”