पहिल्या ६ षटकांतच भारताला दोन मोठे धक्के

दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताचे दोन फलंदाज तंबूत परतले आहेत. सलामीवीर मुरली विजय ० तर केएल राहुल ८ धावांवर बाद झाले आहेत.

या दोनही सलामीवीरांना जेम्स अॅंडरसनने बाद केले आहे.

मुरली विजयने केवळ ५ चेंडूंचा सामना केला. ज्यात त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्याला जेम्स अॅंडरसनने त्रिफळाचीत केले.

तर केएल राहुलने १४ चेंडूंचा सामना करताना ८ धावा केल्या. तो अॅंडरसननच्याच गोलंदाजीवर यष्टीरक्षक जाॅनी बेअरस्ट्रोकडे झेल देत तंबुत परतला.

सध्या कर्णधार विराट कोहली (१) आणि चेतेश्वर पुजारा (१) मैदानावर आहेत. पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला आहे. भारताच्या ६.३ षटकांत २ बाद ११ धावा झाल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

अनुष्का शर्मा टीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्यामागे हे आहे खरे कारण

सौरव गांगुली म्हणतो, हे केल्यास आर अश्विनची ताकद आणखी वाढणार

-आयसीसीने घेतला महत्त्वाचा निर्णय, टी-२० क्रिकेट येणार धोक्यात!