एशिया कपमधील खराब कामगिरीचा मला बळीचा बकरा बनवले गेले

पुढील महिन्यात इंग्लंड संघ श्रीलंका दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यातील वनडे आणि कसोटी मालिकांसाठी श्रीलंकाने बुधवारी (26 सप्टेंबर) त्यांचे संघ जाहिर केले आहेत. पण या वनडे संघात माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूजला मात्र स्थान देण्यात आलेले नाही.

यानंतर मॅथ्यूजने म्हटले आहे की श्रीलंका क्रिकेट बोर्डने त्याला सध्या संयुक्त अरब अमिरातीत सुरु असलेल्या एशिया कपमधील श्रीलंका संघाच्या खराब कामगिरीबद्दल बळीचा बकरा बनवले आहे.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मॅथ्यूजला एशिया कपमधील खराब कामगिरीनंतर कर्णधारपद सोडण्यास सांगण्यात आले आणि एशिया कपमधून दुखापतीमुळे बाहेर असलेल्या दिनेश चंडिमलला श्रीलंकेचा कर्णधार करण्यात आले.

श्रीलंकेचे या एशिया कप स्पर्धेत साखळी फेरीमध्ये अफगाणिस्तान आणि बांगलादेश विरुद्ध झालेल्या पराभवामुळे आव्हान संपुष्टात आले.

तसेच मागील काही महिन्यांपासून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये श्रीलंकेची कामगिरी खराब झाली आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या निवड समिती सदस्यांनी संघाचे नेतृत्व बदलले.

तसेच प्रसिद्धी पत्रकात म्हटल्याप्रमाणे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने अँजेलो मॅथ्यूजला वनडे आणि टी20 राष्ट्रीय संघाचे कर्णधारपद सोडण्याची विनंती केली होती.

त्यानंतर मॅथ्यूजने पत्राद्वारे बोर्डाला उत्तर दिले आहे. त्याने यात म्हटले आहे की, “मला एशिया कपमधील बांगलादेश आणि अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या पराभवासाठी बळीचा बकरा बनवले गेले.”

तसेच तो पुढे म्हणाला आहे की, ‘ मी या कामगिरीची जबाबदारी घेण्यास तयार आहे. पण त्याचवेळी सगळा दोष माझ्यावर टाकला जात असेल तर माझा विश्वासघात झाल्यासारखे वाटत आहे.’

महत्त्वाच्या बातम्या-

कोरिया ओपनच्या उपउपांत्यपुर्व सायनाचा धडाक्यात प्रवेश

विंडिज विरुद्ध कसोटी मालिकेसाठी या खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी

बापरे! भारत दौऱ्यावर आलेल्या त्या संघाला सरावाला साधं मैदान मिळालं नाही