जेव्हा क्रिकेटर भज्जी घेतो बाॅलीवूडच्या सिमरनची भेट

क्रिकेट आणि बाॅलीवूड यांचे नाते फारच जवळचे आहे. अनेक क्रिकेटपटू बाॅलीवूडच्या तारकांचे प्रशंसक आहेत. तर काहींनी अभिनेत्रींसोबत संसार देखील मांडला आहे. त्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने बाॅलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत विवाह केला आहे. भारतीय फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने सुद्धा गीता बसरा या अभिनेत्री सोबत आपला संसार थाटला आहे.

हल्ली ट्विटरवर जरा जास्तच अॅक्टीव्ह असणाऱ्या हरभजन सिंगने मंगळवारी (9 आॅक्टोबरला) ट्विटरवर काजोल सोबतचा सेल्फी शेअर केला आहे.

‘जेव्हा मी सिमरनला भेटतो’ अश्या स्वरूपाच्या आशयासोबत हरभजनने काजोलला तिच्या येणाऱ्या सिनेमासाठी सुभेच्छा दिल्या आहेत.
चाहत्यांनी हरभजनचे हे ट्विट चांगलेच शेअर करत प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

भारताविरूद्धच्या गचाळ कामगिरीनंतर हरभजनने विंडिजच्या संघावर ट्विटरवर सडकून टीका केली होती. त्यामुळे त्याला चाहत्यांच्या आणि आजी-माजी क्रिकेटपटूंच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.
महत्वाच्या बातम्या-