बेन स्टोक्समुळे जॅक लीचला कायमस्वरुपी मिळणार मोफत चश्मा, जाणून घ्या कारण

लीड्स। इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात हेडिंग्ले, लीड्स येथे शेवटच्या क्षणापर्यंत रोमांचकारी ठरलेल्या तिसऱ्या ऍशेस कसोटी सामन्यात इंग्लंडने 1 विकेटने विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच इंग्लंडने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.

इंग्लडकडून या विजयात बेन स्टोक्सने दुसऱ्या डावात नाबाद 135 धावांची शतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला.

विशेष म्हणजे त्याने शेवटच्या विकेटसाठी जॅक लीचबरोबर महत्त्वपूर्ण नाबाद 76 धावांची भागीदारीही रचली आणि इंग्लंडला विजय साकारुन दिला. स्टोक्स आणि लीचने केलेल्या या भागीदारीत लीचने 17 चेंडू खेळताना केवळ 1 धावेचे योगदान दिले होते. पण त्याने या दरम्यान स्टोक्सची भक्कम साथ दिली होती.

पण तो फलंदाजी करत असताना त्याचा चश्मा पुसून मग खेळत असताना दिसून आला. त्यामुळे सामना संपल्यानंतर स्टोक्सने ऍशेस मालिकेचे प्रायोजक आणि चश्मा बनवणारी कंपनी स्पेकसेव्हरला ट्विट करुन लीचसाठी कायमस्वरुपी मोफत चश्मा देण्याची विनंती केली होती. स्पेकसेव्हरनेही स्टोक्सची ही विनंती मान्य केली.

स्टोक्सने ट्विट केले होते की ‘स्पेकसेव्हर एक कृपा करा आणि लीचला कायस्वरुपी मोफत चश्मा द्या.’

यावर उत्तर देताना स्पेकसेवरने ट्विट केले आहे की ‘आम्ही जॅक लीचला कायमस्वरुपी मोफत चश्मा देऊ.’

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात सर्वबाद 246 धावा केल्या होत्या. तसेच त्यांनी पहिल्या डावात मिळवलेल्या 112 धावांच्या आघाडीसह इंग्लंडसमोर विजयासाठी 359 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग इंग्लंडने दुसऱ्या डावात स्टोक्स आणि लीचच्या भागीदारीच्या मदतीने 125.5 षटकात 9 विकेट्स गमावत पूर्ण केला.

तत्पूर्वी या सामन्यात  ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 179 धावा केल्या होत्या. तर इंग्लंडचा पहिला डाव 67 धावांतच संपुष्टात आला होता.

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चौथा ऍशेस कसोटी सामना मँचेस्टरला 4 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.

क्रिडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विंडीज विरुद्ध शतकी खेळी करत अजिंक्य रहाणेने मोडला कपिल देव यांचा हा खास विक्रम

जे कोणत्याही आशियाई गोलंदाजाला जमले नाही ते जसप्रीत बुमराहने करुन दाखवले!

शिवशक्ती क्रीडामंडळने पटकावले पुणेरी पलटण आंतर क्लब कबड्डी, नाशिक स्पर्धेचे विजेतेपद