विराट अनुष्काच्या लग्नाच्या बातमीला जॅकलिन फर्नांडिस कडून पुष्टी?

0 166

सध्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे लग्न खरेच होणार आहे की नाही याबद्दल चांगलीच चर्चा रंगली आहे आणि आता या त्यांच्या लग्नाच्या बातमीला अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसकडून पुष्टी देण्यात आली आहे.

विराट आणि अनुष्का १२ ते १५ डिसेंबर दरम्यान इटलीतील मिलान शहरात लग्न करणार असल्याचे वृत्त आहे. अनुष्का मुंबईहून आपल्या कुटुंबासमवेत इटलीला गेली असल्याचे समजले होते. तसेच यांच्या लग्नासाठी निमंत्रित पाहुण्यांच्या यादीत सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, अमीर खान आणि शाहरुख खान यांचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे. तसेच २२ डिसेंबरला मुंबईत रिसेपशन असण्याचीही शक्यता आहे.

असे असले तरी विराट किंवा अनुष्काकडून अधिकृतपणे कोणतेही वृत्त आलेले नाही. पण काल लक्स गोल्डन रोझ अवॉर्ड्स निमित्त आलेल्या अभिनेत्री जॅकलिनला जेव्हा विराट अनुष्काला शुभेच्छा द्यायला आवडेल का असे विचारल्यावर तिने आनंदात सांगितले की ” मी खूप उत्सुक आहे. मला असे वाटते की खूप चांगली बातमी आहे. मी अनुष्का आणि विराटसाठी खूप आनंदी आहे. मी आता वाट बघू शकत नाही.”

त्याचवेळी जेव्हा पत्रकारांनी तिला विचारलं की तुला ते लग्न करणार आहेत ही बातमी खरी आहे की नाही हे माहित आहे का, असे विचारताच ती खुप बोलली आहे असे लक्षात घेऊन तिने पुढे कोणत्याही प्रश्नाला उत्तर दिले नाही.

याबरोबरच अनुष्काची चांगली मैत्रीण असणारी कतरीना कैफनेही यावर काही बोलण्यास नकार दिला. तसेच करीना कपूरही यावर काही बोलली नाही. सुशांत सिंग राजपूतने त्याला ही बातमी दिली याबदल आभार मानून जर ही बातमी खरी असेल तर मला आनंद होईल असे सांगितले.

Comments
Loading...
%d bloggers like this: