जॅक कॅलिसने केली अंडर-19 वर्ल्डकप जिंकलेल्या या खेळाडूंची प्रशंसा

दक्षिण अफ्रिकेचा माजी खेळाडू व सध्याचा कोलकाता नाइट राइडर्सचा प्रशिक्षक जॅक कॅलिसने भारताचे अंडर-19 चे खेळाडू शुबमन गिल व शिवम मावीची प्रशंसा केली आहे.  जॅक कॅलिसच्या मते या दोन्ही खेळाडूंकडे भरपुर प्रतिभा आहे व हे दोन्ही खेळाडू आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठं नाव कमावतील.

जॅक कॅलिस म्हणाला की, शुबमन गिल हा प्रतिभावान खेळाडू आहे.  तो  कोणत्याही संघासाठी एक चांगला टाॅप आॅर्डरचा फलंदाजआहे ; पण जर त्याला सहाव्या किंवा  सातव्या  क्रंमाकावर फलंदाजी करण्याची संधी मिलाली तर तो त्या संधीचे देखील सोने करेल. मावी जलद गोलंदाजी करु शकतो, त्यामुळे ती निश्चितच एक चांगली गोष्ट आहे.

शुबमन गिल व शिवम मावी हे दोन्ही खेळाडू भारताने या वर्षी जिंकलेल्या अंडर-19 वर्ल्डकप संघाचे सदस्य होते.  हे दोन्ही खेळाडू आयपीयलमध्ये कोलकाता नाइट राइडर्स या संघाकडून खेळतात. कोलकाता नाइट राइडर्सने शुबमन गिलला 1.8 कोटी आणि शिवम मावीला 3 कोटीला खरेदी केले आहे.

शुबमन गिलने अंडर-19 वर्ल्डकप स्पर्धेत चार अर्धेशतकासह सेमी फायनलमध्ये पाकिस्तान विरुध्द शतकी खेळी केली होती. तर शिवम मावीने 4.2 च्या इकोनाॅमीने 9 विकेट घेतले होते.

शुबमन गिल कोलकाता नाइट राइडर्सकडुन खेळताना पहिल्याच सामन्यात केवळ 3 धांवावर बाद झाला होता तर शिवम मावीला एकही विकेट भेटली नव्हती.

तसेच, जॅक कॅलिसने कोलकाता नाइट राइडर्सकडुन खेळताना 70 सामन्यात 1603 धावा आणि 48 विकेट घेतले आहेत.