18व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 25000 डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत याशीना इक्तेरीना, मरियम बोलकवडझ, ची-यु सु यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का

भारताच्या महक जैनचे आव्हान संपुष्टात   

पुणे: डेक्कन जिमखाना क्लब यांच्या वतीने आयोजित नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी)प्रायोजित आयटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 18व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीच्या दुसऱ्या फेरीत रशियाच्या याशीना इक्तेरीना, जॉर्जियाच्या मरियम बोलकवडझ, तैपेईच्या  ची-यु सु या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत रशियाच्या  याशीना इक्तेरीना हिने पाचव्या मानांकित जपानच्या जुनरी नमिगताचा 6-3, 6-1असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. तैपेईच्या ची-यु सु हिने पोलंडच्या सातव्या मानांकित कॅटरझायना पीटरचे आव्हान 6-3, 6-3असे मोडीत काढले. जॉर्जियाच्या मरियम बोलकवडझने सहाव्या मानांकित युक्रेनच्या व्हॅलेरिया स्ट्राकोवाचा टायब्रेकमध्ये 6-1, 6-7(2), 6-4असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत मारली. चीनच्या अव्वल मानांकित जिया-जिंग लू हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत भारताच्या वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या महक जैनचा6-3, 7-5असा पराभव करून आगेकूच केली. चुरशीच्या झालेल्या लढतीत चौथ्या मानांकित लातवियाच्या डायना मर्सीकेविचाने रोमानियाच्या जॅकलिन क्रिस्टियनचा 6-3, 5-7, 6-3असा संघर्षपूर्ण पराभव केला. रशियाच्या व्हॅलेरिया सवयिंखने बल्जेरियाच्या अलेक्झांड्रा नेदिनोवावर टायब्रेकमध्ये  6-3, 7-6(3)असा विजय मिळवला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी फेरी: एकेरी गट:
जिया-जिंग लू(चीन)(1)वि.वि. महक जैन(भारत)6-3, 7-5;
डायना मर्सीकेविचा(लातविया)(4)वि.वि.जॅकलिन क्रिस्टियन(रोमानिया) 6-3, 5-7, 6-3;
मरिना  मेलनिकोवा(रशिया)वि.वि.बेरफू सेंजीज(टर्की) 6-0, 4-6, 6-2;
याशीना इक्तेरीना(रशिया)वि.वि.जुनरी नमिगता(जपान)(5)6-3, 6-1;
व्हॅलेरिया सवयिंख(रशिया)वि.वि.अलेक्झांड्रा नेदिनोवा(बल्जेरिया) 6-3, 7-6(3);
कॅटरझायना कावा(पोलंड)(3)वि.वि.जुली जेर्विस(फ्रांस) 6-1, 1-0 सामना सोडून दिला;
ची-यु सु(तैपेई)वि.वि.कॅटरझायना पीटर(पोलंड)(7)6-3, 6-3;
मरियम बोलकवडझ(जॉर्जिया)वि.वि. व्हॅलेरिया स्ट्राकोवा(युक्रेन)(6) 6-1, 6-7(2), 6-4;

दुहेरी गट: उपांत्यपूर्व फेरी:
बेरफू सेंगीज(टर्की)/जेस्सी रॉमपीज(इंडोनेशिया)(2)वि.वि.निका कुखरचूक(रशिया)/ पी ची ली(तैपेई)6-1, 6-3;

पोलीना लेकीना(रशिया)/डायना मर्सीकेविचा(लातविया)वि.वि. कॅटरझा यना कावा(पोलंड)/ वेबली स्मिथ(ग्रेट ब्रिटन)6-3, 6-4;

शेरॉन फिचमन(कॅनडा)/व्हॅलेरिया सावींख(रशिया)(4)वि.वि.अमिना अंशबा(रशिया)/ मारिया माफुर्तीना(रशिया)  6-4,6-0  

बिट्राईस गुमूल्या(इंडोनेशिया)/एना वेस्लीनोविक(मॉंटेनिग्रो)वि.वि. मरियम बोलकवडझ(जॉर्जिया)/अल्बिना खबीबुलीना(उझबेकिस्तान)  7-5,7-5