पुणे ओपन आयटीएफ टेनिस स्पर्धेत पात्रता फेरीतील 7 भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात

पुणे: नवनाथ शेटे स्पोर्टस्‌ अकादमी तर्फे आयोजित एआयटीए, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 25000 डॉलर बीव्हीजी पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत भारताच्या महक जैन, तेजस्वी काटे,  मिहिका यादव, सौजन्या बाविशेट्टी,  हुमेरा शेख,नताशा पल्हा, प्रतिभा नारायण या 7 भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत जॉर्जियाच्या तिसऱ्या मानांकित मरीम बोलकवडेझने भारताच्या महक जैनचा 3-6, 6-3, 6-4असा संघर्षपूर्ण पराभव केला. बाराव्या मानांकित यूएसएच्या ऍनॅस्टेसिया नफिदोवा हिने भारताच्या तेजस्वी काटेला 6-1, 6-1असे नमविले. चौदाव्या मानांकित ब्राझीलच्या क्रिस्टिना पॉलाने भारताच्या मिहिका यादवचा 6-4, 6-2असा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.

ऑस्ट्रेलियाच्या कायलाह मॅकफीने भारताच्या सौजन्या बाविशेट्टीचा 6-4, 6-3असा तर, पाचव्या मानांकित रशियाच्या

याशिना इक्तेरिनाने भारताच्या हुमेरा शेखचा  3-6, 6-1, 6-2असा पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली पात्रता फेरी:

क्रिस्टिना पॉला(ब्राझील)(14)वि.वि.मिहिका यादव(भारत) 6-4, 6-2;

मरीम बोलकवडेझ(जॉर्जिया)(3)वि.वि.महक जैन(भारत) 3-6, 6-3, 6-4;

ऍनॅस्टेसिया नफिदोवा(यूएसए)(12)वि.वि.तेजस्वी काटे(भारत) 6-1, 6-1;

मियाबी इनाऊ(जपान)(6)वि.वि.डॉमिनिक्यु क्यार्गत(नेदरलॅंड) 6-4, 6-3;

कॅथरीना गेरलेच(जर्मनी)वि.वि.मिलानी क्लफनर(ऑस्ट्रिया) 6-2, 7-5;

पीआ कूक(स्लोव्हेनिया)(15)वि.वि.नताशा पल्हा(भारत)7-6(5), (7)6-7, 7-5;

सेकुलीक सराह रिबेका(जर्मनी)(9)वि.वि.प्रतिभा नारायण(भारत) 6-1, 6-1;

कायलाह मॅकफी(ऑस्ट्रेलिया)वि.वि.सौजन्या बाविशेट्टी(भारत) 6-4, 6-3;

याशिना इक्तेरिना(रशिया)(5)वि.वि.हुमेरा शेख(भारत) 3-6, 6-1, 6-2;