प्रो कबड्डी: जयपूरचा निसटता विजय

प्रो कबड्डीमध्ये शुक्रवारी दुसरा सामना बेंगलूरु बुल्स आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यात झाला. या सामन्यात जयपूरने ३०-२८ असा विजय मिळवला. बेंगलूरु बुल्ससाठी रोहित कुमारने उत्तम कामगिरी केली आणि ‘सुपर टेन’ मिळवले. जयपूरसाठी जसवीर सिंगयाने ‘सुपर टेन’ मिळवला.डिफेन्समध्ये मंजीत चिल्लर याने ८ गुण मिळवत ‘हाय ५’ मिळवला.

पहिल्या सत्रापासूनच खेळ जरा आक्रमक झाला. ७ व्या मिनिटाला जयपूर ७-३ असा पुढे होता. १३व्या मिनिटाला रोहीत बेंगलूरु बुल्स संघाला १२-८ असे आघाडीवर नेले. पहिल्या सत्राच्या शेवटच्या रेडमध्ये बेंगलूरु बुल्स ऑल आऊट झाले. जेव्हा पहिले सत्र संपले होते तेव्हा सामना १७-१४ असा जयपूरकडे झुकला होता.

दुसऱ्या सत्रात ५व्या मिनिटाला जयपूरने आघाडी वाढवून २१-१४ अशी केली. १४व्या मिनिटाला जयपूर २८-२० असे पुढे होते. शेवटच्या काही मिनिटात रोहीत कुमारने उत्तम खेळ करत बेंगलूरु बुल्सला सामना जिंकण्याच्या जवळ आणून ठेवले. त्याने शेवटच्या मिनिटात सामना २८-२९ असा केला. सामन्यातील शेवटची रेड करणाऱ्या जसवीरने केली आणि त्यात एक गुण मिळवला. त्यामुळे हा सामना जयपूरने ३०-२८ असा जिंकला.

अत्यंत उत्कंठावर्धक झालेल्या या सामन्यात डिफेन्समधील उत्तम कामगिरीचा जयपूरला फायदा झाला. या सामन्यात मंजीत चिल्लरने उत्तम डिफेन्सिव्ह खेळ करताना आपल्या भूतपूर्व संघाला हरवले.