सचिनला ९ वेळा बाद करणाऱ्या अँडरसनच्या कसोटीमध्ये ५०१ विकेट्स

क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि मायकल क्लार्कला तब्बल ९वेळा बाद करणाऱ्या इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने काल खास विक्रम केला. कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स घेणारा तो केवळ ६वा खेळाडू बनला.

१२९ कसोटी सामन्यात ही कामगिरी करताना त्याने २७.५२ च्या सरासरीने ५०१ विकेट्स घेतल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो केवळ तिसरा वेगवान गोलंदाज आहे.

सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे गोलंदाज
८०० मुथय्या मुरलीधरन
७०८ शेन वॉर्न
६१९ अनिल कुंबळे
५६३ ग्लेन मॅकग्रा
५१९ कॉर्टनी वॉल्श
५०१ जेम्स अँडरसन