जेम्स अँडरसन बनला कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात द ओव्हल मैदानावर पार पडलेला पाचवा कसोटी सामना इंग्लंडने 118 धावांनी जिंकला. त्याचबरोबर 5 सामन्यांची कसोटी मालिकाही इंग्लंडने 4-1 अशा फरकाने जिंकली आहे.

या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडसरनने एक खास विक्रम केला आहे. त्याने या सामन्यात पहिल्या डावात 2 आणि दुसऱ्या डावात 3 विकेट अशा मिळून सामन्यात 99 धावात 5 विकेट्स घेतल्या.

यामुळे तो आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज बनला आहे. त्याने आत्तापर्यंत कसोटीत त्याने 143 सामन्यात 564 विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच त्याने हा पराक्रम करताना आॅस्ट्रेलियाचे दिग्गज वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकॅग्राथ यांच्या 563 विकेट्सला मागे टाकले आहे.

याबरोबरच अँडरसन हा आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर मुथय्या मुरलीधरन आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे आहे.

अँडरसन हा नुकताच भारताविरुद्ध कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता. त्याने भारताविरुद्ध 110 विकेट्स घेतल्या आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज:

800 विकेट्स – मुथय्या मुरलीधरन

708 विकेट्स – शेन वॉर्न

619 विकेट्स – अनिल कुंबळे

564 विकेट्स – जेम्स अँडरसन*

563 विकेट्स – ग्लेन मॅकॅग्राथ

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

ला लीगा: स्पेन फुटबॉल असोसिएशन ठरवणार अमेरिकेत या संघांना खेळावायचे की नाही

श्रीलंका दौरा: स्म्रीती मानधनाने अर्धशतक करत भारतीय महिला संघाला मिळवून दिला पहिला विजय

स्वित्झर्लंड विरुद्धच्या मैत्रीपूर्व सामन्यास इंग्लंड स्ट्रायकर हॅरी केनला विश्रांती