१० दिवसांतच जेम्स अँडरसनने केली कोर्टनी वॉल्श यांच्या दुसऱ्या एका विक्रमाची बरोबरी

मेलबॉर्न । ॲशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लडच्या जेम्स अँडरसनने कोर्टनी वॉल्श यांच्या कसोटी क्रिकेटमधील ५१९ विकेट्सच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. त्याने १३३ कसोटी सामन्यात २७.३८च्या सरासरीने २४८ डावात ही कामगिरी केली आहे.

कोर्टनी वॉल्श यांनी विंडीजकडून खेळताना १३२ सामन्यात २४.४४च्या सरासरीने ५१९ विकेट्स घेतल्या आहेत. वेगवान गोलंदाजमध्ये ज्यांनी सर्वाधिक कसोटी विकेट्स घेतल्या आहेत त्यात अँडरसनच्या पुढे आता केवळ ग्लेन मॅकग्रा आहे. त्याने १२४ सामन्यात ५६३ विकेट्स घेतल्या आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता जेम्स अँडरसन ५व्या स्थानावर पोहचला आहे. 

तिसऱ्या कसोटीत १० दिवसांपूर्वीच मोडला होता हा विक्रम

तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लडच्या जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड जोडीने एकत्र खेळताना १०० सामन्यात ७६३ विकेट्स घेतल्या होत्या. दोन वेगवान गोलंदाजांनी एकत्र खेळताना घेतलेल्या या सर्वाधिक विकेट्स आहेत.

यापूर्वी हा विक्रम विंडीजच्या महान कोर्टनी वॉल्श आणि कर्टली एम्ब्रोस या जोडीच्या नावावर होता. त्यांनी ९५ कसोटी सामने एकत्र खेळताना ७६२ विकेट्स घेतल्या होत्या.