स्मिथ म्हणतो हा आहे जगातील सर्वात मोठा स्लेजिंग करणारा खेळाडू !

दुसऱ्या ऍशेस सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेला पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने जिमी अँडरसनला सर्वात मोठा स्लेजिंग करणारा खेळाडू खेळाडू म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी एका लेखात जिमी अँडरसनने ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर टीका करताना ते मोठ्या प्रमाणावर स्लेजिंग करतात असे म्हटले होते. यावर स्मिथने भाष्य करताना म्हटले आहे, ” हा लेख मनोरंजक होता. मी तो वाचला आहे. त्यात आम्हाला स्लेजिंग करणारे आणि गुंड प्रवृत्तीचे म्हटले आहे. “

” परंतु मी प्रामाणिकपणे सांगतो, जिमी अँडरसन हाच सर्वात मोठा स्लेज करणारा खेळाडू आहे. “

” माझ्याबद्दल बोलायचे झाले तर २०१०मध्ये जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा मला जिमीच्या या स्लेज वागण्याचा चांगलाच अनुभव आलेला आहे. तो यात दुसऱ्या खेळाडूंना सतत ओढत असतो. “