Video: तर अँडरसन दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळला नसता

इंग्लंड विरुद्ध भारत संघातील पहिला कसोटी सामना 4 आॅगस्टला चौथ्याच दिवशी इंग्लंडने जिंकला. त्यामुळे खेळाडूंना एक दिवस जास्त विश्रांती मिळाली आहे.

या विश्रांतीच्या दिवशी इंग्लंडचे वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी गोल्फ खेळने पसंत केले, पण या नादात अँडरसन मोठी दुखापत होण्यापासून बचावला आहे.

याचा व्हिडिओ ब्रॉडने ट्विटरवर शेअर केला आहे. यात अँडरसनने गोल्फ बॉल जोरात मारला पण तो बॉल झाडाला लागुन जोरात अँडरसनच्या चेहऱ्याला लागला. या व्हिडिओला कॅप्शन देताना ब्रॉडने हसण्याची इमोजीही टाकली आहे.

अँडरसनच्या चेहऱ्याला गोल्फ बॉल लागला असली तरी त्याला गंभीर दुखापत झालेली नाही. त्यामुळे तो 9 आॅगस्ट पासून सुरु होणाऱ्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध असणार आहे.

अँडरसन हा इंग्लंडचा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने 139 कसोटी सामन्यात 544 विकेट्स घेतल्या आहेत.

ब्रॉडने टाकलेल्या अँडरसनच्या या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

कर्णधार कोहलीला ट्रोल करणे आयसीसीच्या चांगलेच अंगलट

क्रिकेट खेळायला गेला आहात, युरोप फिरायला नाही; सुनिल गावसरांनी साधला टीम इंडियावर निशाना

इतिहासात नोंद झालेली विकेट आणि वेंकटेश प्रसाद