एकाच षटकात या फलंदाजाने काढल्या ३४ धावा, केली डिविलियर्सच्या विक्रमाची बरोबरी

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात आजपासून(3 जानेवारी) तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात आज न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जेम्स निशामने एकाच षटकात 5 षटकार मारत 34 धावा केल्या आहेत.

या सामन्यात त्याने न्यूझीलंडच्या डावात 49 व्या षटकात हा पराक्रम केला आहे. या षटकात श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू थिसेरा परेरा गोलंदाजी करत होता. निशाम जवळजवळ दिड वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळत आहे. त्याने याआधी शेवटचा सामना जून 2017 मध्ये खेळला होता.

त्याने या सामन्यात 13 चेंडूत नाबाद 47 धावा केल्या. याबरोबरच तो वनडेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करण्याऱ्या फलंदाजांच्या यादीत एबी डिविलियर्ससह तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. डिविलियर्सने 2015 मध्ये सिडनीत जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर एका षटकात 34 धावा केल्या होत्या.

या यादीत अव्वल क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू हर्षल गिब्स आहेत. त्यांनी वनडेमध्ये 6 चेंडूत 6 षटकार मारले होते. त्यांनी हा विक्रम 2007 मध्ये सेंट किट्समध्ये खेळताना केला होता. त्यामुळे त्यांनी एका षटकात 36 धावा केल्या होत्या.

तसेच त्यांच्या पाठोपाठ या यादीत दुसऱ्या क्रमांकावर थिसरा परेरा असून त्याने 2013 मध्ये पल्लेकेले येथे खेळताना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रॉबिन पिटरसनच्या गोलंदाजीवर एका षटकात 5 षटकार मारताना 35 धावा केल्या होत्या.

विशेष म्हणजे आज परेराच्या गोलंदाजीवर निशाने एका षटकात 5 षटकारांसह 34 धावा केल्या आहेत. त्यामुळे परेरा हा वनडेमध्ये एका षटकात 30 पेक्षा अधिक धावा करणारा आणि 30 पेक्षा अधिक धावा देणारा पहिला खेळाडू ठरला आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा युवराज सिंग नंतरचा दुसरा खेळाडू ठरला आहे.

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील या सामन्यात निशाम बरोबरच मार्टिन गप्टीलने 138 धावांची शतकी खेळी तर केन विलियमसन(76) आणि रॉस टेलरनेही(54) अर्धशतकी खेळी केली आहे. यांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 371 धावा केल्या होत्या.

त्यामुळे 372 धावांचे आव्हान श्रीलंका संघाला होते. परंतू श्रीलंकेला 49 षटकात सर्वबाद 326 धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांना या सामन्यात 45 धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंडकडून निशामनेच 3 विकेट घेतल्या आहेत.

वनडेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज – 

36 – हर्षल गिब्स (गोलंदाज – डॅन वॅन बुंग, 2007)

35 -थिसरा परेरा (गोलंदाज – रॉबिन पीटरसन, 2013)

34 – एबी डिविलियर्स (गोलंदाज – जेसन होल्डर, 2015)

34 – जेम्स निशाम (गोलंदाज – थिसरा परेरा, 2019)

महत्त्वाच्या बातम्या:

हेडन- सचिनला जे १० वर्षांपुर्वी जमल ते पुजाराने आता करुन दाखवलं

आता या दिग्गजांच्या यादीत पुजाराचे नाव गर्वाने घेतले जाणार

विराट- पुजारामध्ये घडून आला दशकातील सर्वात बाप योगायोग