बापरे! केवळ २८वर्षीय क्रिकेटर करणार खेळाडूंची निवड, इंग्लंडच्या निवड समितीवर नियुक्त

माजी क्रिकेटपटू जेम्स टेलरची इंग्लंड क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याची घोषणा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट संघाने शुक्रवारी (१३ जुलै) केली.

जेम्स टेलर इंग्लंडकडून २०१२ ते २०१६ या काळात सात कसोटी आणि २७ एकदिवसीय सामने खेळला आहे.

मात्र २०१६ साली हृदय विकाराचे निदान झाल्याने वयाच्या २६ व्या वर्षी जेम्स टेलरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

“मला हे महत्त्वाचे पद देऊन ईबीसीने माझा सन्मान केला आहे. मला पुन्हा एकदा इंग्लंड क्रिकेट संघासाठी योगदान देण्याची संधी मिळाल्याने मी या पदावर काम करण्यास उत्सुक आहे.” इंग्लंड क्रिकेट संघाच्या निवड समितीवर नियुक्ती झाल्यानंतर टेलरने त्याच्या भावना या शब्दात व्यक्त केल्या.

देशांतर्गत आणि समकालिन क्रिकेटचा मोठा अनुभव आणि अभ्यास असल्याने टेलरची निवड समितीवर नियुक्ती केली असल्याचे ईसीबी च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

जेम्स टेलरची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द-

जेम्स टेलर इंग्लंकडून ७ कसोटी सामने खेळला आहे. त्यामध्ये त्याने २६ च्या सरासरीने ३१२ धावा केल्या आहे.

२७ एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचे प्रतिनिधित्व करताना टेलरने ४२.२४ च्या सरासरीने ८८७ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

भारताला वनडे मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी

भारतीय अ संघाचा वेस्टइंडिज अ संघावर विजय