जेसन होल्डरच्या ऑल टाइम ११ मध्ये केवळ एकच भारतीय क्रिकेटर

विंडीज संघाचा कर्णधार जेसन होल्डरने ऑल टाइम ११ हा संघ निवडला असून त्यात सचिन तेंडुलकर हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. लॉर्ड्स ग्राउंडच्या सहयोगाने त्याने हा संघ बनवला आहे.

त्याच्या संघात क्रिकेट दिग्गजांमधील सचिन तेंडुलकर, शेन वॉर्न आणि ब्रायन लारा हे खेळाडू आहेत. सचिनबद्दल बोलताना हेडन म्हणतो, ” त्याचे विक्रम आणि त्याने या खेळासाठी दिलेले योगदान खूप मोठं आहे. ”

कुमार संगकाराला सलामीवीर म्हणून निवडण्याबद्दल संगकारा म्हणतो, ” त्याचे केलेले विक्रम हे नक्कीच सामान्य नाहीत. माझ्यासाठी तो माझ्या स्वप्नातील ११मधील खेळाडू आहे. ”

लॉर्ड्स ग्राउंड हे विविध खेळाडूंच्या मदतीने त्यांची ड्रीम ११ टीम बनवते. याची घोषणा ते युट्यूबवरही प्रसिद्ध करतात. अनेक खेळाडूंनी आजपर्यंत असे संघ बनवले आहेत.

जेसन होल्डरचा ड्रीम ११:
मॅथ्यू हेडन, कुमार संगकारा, रिकी पॉन्टिंग, ब्रायन लारा, सचिन तेंडुलकर, जॅक कॅलिस, ऍडम गिलख्रिस्ट, शेन वॉर्न, डेल स्टेन, कर्टली अँब्रोस, ग्लेन मॅकग्रा