टाॅप ४- जसप्रीत बुमराहचे ते ४ नो बाॅल आणि इतिहास…

साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पहिल्याच दिवशी चांगली कामगिरी केली आहे.

परंतू त्याचबरोबर जसप्रीत बुमराह आणि नो बॉलवरील विकेटचे सत्र चाहत्यांना या सामन्यातही पहायला मिळाले. त्याने पहिल्या डावातील पाचव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर इंग्लंड कर्णधार जो रुटला पायचीत बाद करण्यासाठी अपील केले होते.

परंतू पंचानी नाबाद ठरवले. त्यामुळे रुट बाद असल्याचा पूर्ण विश्वास असणाऱ्या बुमराहने भारताचा कर्णधार विराट कोहलीला डीआरएस घेण्यास सांगितले. पण यात बुमराहने नो बॉल टाकला असल्याचे आढळल्याने रुटला जीवदान मिळाले.

नंतर इशांतने रुटला लगेच बाद केल्यामुळे भारताला याचा मोठा फटका बसला नाही ही गोष्ट वेगळी.

परंतु यापुर्वी मात्र बुमराहच्या नो- बाॅलचा टीम इंडियाला चांगलाच फटका बसला आहे.

१. फकार झमान, २०१७ आयसीसी चॅम्पीयन्स ट्राॅफी, लंडन

हा नो बाॅल प्रत्येक भारतीय चाहत्याच्या मनात कायमचा लक्षात राहिल असाच होता. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकल्यावर पाकिस्तानला प्रथम फलंदाजीला पाचारण केले. हा निर्णय किती योग्य होता हे जेव्हा फकार झमान ३ धावांवर बाद झाला तेव्हा समजले. परंतु जेव्हा हा चेंडू रिप्लेमध्ये पाहण्यात आला तेव्हा त्यात बुमराहने ओव्हरस्टेपिंग केले होते.

याच झमानने पुढे जात या सामन्यात १०६ चेंडूत ११४ धावा केल्या. त्याच्या याच खेळीच्या जीवावर पाकिस्तानने ५० षटकांत ४ बाद ३३८ धावा केल्या आणि गतविजेत्या भारताला अखेर पराभूत करत आयसीसी चॅम्पीयन्स ट्राॅफी जिंकली.

२. उपुल तरंगा, भारत विरुद्ध श्रीलंका, पहिला वनडे, धरमशाला, २०१७

३८ षटकांत केवळ ११२ धावा केलेल्या टीम इंडियाला या सामन्यात गोलंदाजांकडून मोठ्या अपेक्षा होत्या. अपेक्षेप्रमाणे सुरुवातही झाली होती. संघाच्या केवळ ३ धावा झालेल्या असताना दानुष्का गुणथिलका केवळ २ धावांवर बाद झाला होता. त्याला बुमराहने यष्टीरक्षक धोनीकरवी झेलबाद केले होते.

याच सामन्यातील ६व्या षटकातील ५व्या चेंडूवर बुमराहने उपुल थरंगाला बुमराहने दिनेश कार्तिककडे स्लीपमध्ये झेल द्यायला भाग पाडले. परंतु यावेळी पुन्हा रिप्लेमध्ये भारताच्या या प्रतिभावान युवा गोलंदाजाने नो बाॅल टाकल्याचे समोर आले. याच थरंगाने पुढे ४६ चेंडूत ४९ धावांची जबरदस्त खेळी करत लंकेला एकहाती विजय मिळवुन दिला.

३. अदिल राशिद, भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना, ट्रेंट ब्रीज-

वनडे पाठोपाठ बुमराहने कसोटीतही ही मालिका सुरु केली. ज्या डावात बुमराहने इंग्लंडमध्ये ५ विकेट्स घेतल्या त्याच डावात त्याच्यावर ही नो बाॅलची नामुष्की आली. चौथ्या दिवशी जाॅश बटलर, जाॅनी बेअरस्ट्रो आणि ख्रीस वोक्सला बाद केलेल्या बुमराहला या सामन्यात भारताला विजय मिळवुन देण्याची मोठी संधी चालुन आली होती.

यावेळी मैदानावर खेळत असलेल्या आदिल राशिदला एका चांगल्या चेंडूवर विराटकडे झेल देण्यास बुमराहने भाग पाडले. त्याची ही सामन्यातील ५वी विकेट ठरली असती. परंतु जेव्हा हा बाॅल रिप्लेमध्ये पाहण्यात आला तेव्हा बुमराहने ओव्हरस्टेपिंग केलेले समोर आले.

यामुळे त्याला डावातील ५वी विकेट घेण्यासाठी वाट पहावी लागली. तसेच आदिल राशिद शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि त्याने भारतीय संघाला शेवटची एक विकेट बाकी असतानाही पाचव्या दिवशी क्षेत्ररक्षणासाठी मैदानावार यायला भाग पाडले.

४. जो रुट, भारत विरुद्ध इंग्लंड, चौथा कसोटी सामना, साउथॅंप्टन

सध्या सुरु असलेल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावातील पाचव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर बुमराहने इंग्लंड कर्णधार जो रुटला पायचीत बाद करण्यासाठी अपील केले होते.

परंतू पंचानी नाबाद ठरवले. त्यामुळे रुट बाद असल्याचा पूर्ण विश्वास असणाऱ्या बुमराहने भारताचा कर्णधार विराट कोहलीला डीआरएस घेण्यास सांगितले. पण यात बुमराहने नो बॉल टाकला असल्याचे आढळल्याने रुटला जीवदान मिळाले.

नंतर इशांतने रुटला लगेच बाद केल्यामुळे भारताला याचा मोठा फटका बसला नाही ही गोष्ट वेगळी.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

 ५२६ कसोटी सामन्यांत टीम इंडियाकडून पहिल्यांदाच असे घडले

 अश्विन चौथ्या कसोटीत चमकला, कुंबळे- भज्जीच्या यादीत सामील

 तिसरी कसोटी: खराब सुरुवातीनंतर सॅम करनने इंग्लंडला सावरले

एशियन गेम्स: भारताला महिलांच्या थाळीफेक तसेच 1500मीटर शर्यतीत कांस्यपदक