५६ दिवसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असलेल्या बुमराहचा मोठा पराक्रम

नॉटींगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंटब्रिज मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने मंगळवारी (21 आॅगस्ट) चौथ्या दिवसाखेर 9 बाद 311 धावा केल्या आहेत. या सामन्यात भारताला विजयासाठी 1 विकेटची तर इंग्लंडला 210 धावांची गरज आहे.

भारताकडून चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने 5 विकेट घेत महत्त्वाची कामगिरी बजावली.

कारकिर्दीतील पहिल्या ४ कसोटीत डावात दोन वेळा ५ विकेट घेणारा बुमराह हा केवळ तिसरा भारतीय वेगवान गोलंदाज बनला आहे. यापुर्वी मोदम्मद निसार यांनी १९३६ तर मनोज प्रभाकर यांनी १९८९ मध्ये भारताकडून कारकिर्दीतील पहिल्या ४ कसोटीत दोनवेळा डावात ५ विकेट्स घेतल्या होत्या.

बुमराहने हा कारनामा दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड मालिकेतील सामन्यांत केला आहे. तसेच त्याने सलग दोन कसोटी सामन्यात हा पराक्रम केला आहे. जोहान्सबर्ग कसोटीतनंतर बुमराह प्रथमच कसोटीत खेळत होता. जोहान्सबर्गमध्ये त्याने १८.५ षटकांत ५४ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या. भारत ती कसोटी ६३ धावांनी जिंकला होता.

या सामन्यात भारताच्या दोन वेगवान गोलंदाजांनी डावात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. पंड्याने पहिल्या तर बुमराहने दुसऱ्या डावात हा पराक्रम केला आहे. इंग्लंडमध्ये एकाच सामन्यात दोन गोलंदाजांनी ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम भारताकडून केवळ तिसऱ्यांदा घडला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

इंग्लड विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या कसोटीत झाला हा खास विक्रम

केरळच्या महापूरात कुटुंब अडकल्यानंतरही भारताच्या या जलतरणपटूची एशियन गेम्समध्ये चमकदार कामगिरी

सर्व प्रश्नांचं उत्तर केवळ काळ देतो, रुट-कोहलीची ही आकडेवारी पाहुन कळेल नक्की कसे?